मधूर भांडारकर करणार मेहूल चोक्सीवर आधारित चित्रपट ??

मधुर भांडारकर

मुंबई: मे महिन्यात भारतातील मोठ्या घोटाळ्यातील फरार आरोपी मेहूल चोक्सी अँटीगुआ देशातून फरार झाला होता. त्यानंतर तो डोमिनिकामध्ये सापडला असून सध्या तो कॅरेबियाई देशात डोमिनिका पोलिसांच्या ताब्यात आहे. मात्र  एकीकडे मेहूल चोक्सीची देशभर चर्चा असताना आता दिग्दर्शक मधूर भांडारकर मेहूल चोक्सीवर आधारित चित्रपट करणार असल्याच्या चर्चा सुरु झाली आहेत.

मेहूल चोक्सी आणि बारबरा जाबारिकाच्या या कथेवर बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक मधूर भांडारकर यांना चित्रपट बनवण्याची इच्छा आहे. त्यांना ही कथा हटके वाटत आहे. ट्वीट करत त्यांनी त्यांनी लिहीलं की, ‘या कथेवर छोटी वेबसीरिज किंवा चित्रपट बनू शकतो,’ अशी इच्छा त्यांनी सोशल मिडीयावर व्यक्त केली आहे. यानंतर यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. चोक्सीची गर्लफ्रेंड बारबरा जाबारिका  चोक्सीची गर्लफ्रेंड आहे, पण नुकतेच तिने आपण चोक्सीची गर्लफ्रेंड नसल्याचं सांगितले होते.

काही दिवसापुर्वी बारबराने सांगितलं की, ‘चोक्सी मागील वर्षी मला भेटला होता. व त्याने त्यांच नाव राज असं सांगितलं होतं. मागील वर्षीच्या व्हिसीटला आम्ही एकमेकांशी बोललो होतो. चोक्सीच्या किडनॅपिंगमध्ये तिचा कोणताही हात नाही. व ते दोघे फक्त चांगले मित्र आहेत. तिने केवळ त्याला चांगला मित्र म्हणून पाहिलं होते.

महत्वाच्या बातम्या

IMP