मधुर भांडारकर यांच्या हस्ते औरंगाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचे उद्घाटन

सहाव्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे बुधवार, दि. 9 ते रविवार, दि. 13 जानेवारी 2019 या दरम्यान आयनॉक्स प्रोझोन मॉल, औरंगाबाद येथे आयोजन करण्यात आलेले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन  प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या हस्ते होणार असून, या प्रसंगी महोत्सवाच्या पद्मपाणी जीवनगौरव पुरस्काराचे वितरण होणार आहे. यंदा प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक पद्मश्री मा. गिरीष कासारवल्ली यांना पद्मपाणी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

मधुर भांडारकर यांनी बॉलीवूड सिनेमा क्षेत्रात चित्रपट दिग्दर्शक, पटकथाकार व चित्रपट निर्माता या भूमिकेतून उल्लेखनिय कार्य केलेले असून त्यांनी त्रिशक्ती या सिनेमाद्वारे या क्षेत्रात पदार्पण केलेले होते.

पद्मपाणी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार्या ज्येष्ठ दिग्दर्शक गिरीष कासारवल्ली यांना भारतीय समांतर सिनेमांच्या अग्रणींपैकी एक मानले जाते. मुखत्वे कन्नड भाषेतील सिनेमात कार्य केलेले कासारवल्ली यांना आजवर चौदा राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविले आहे.भारत सरकारने त्यांना सन 2011 साली ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविले आहे.

सहा जानेवारी पासून प्रतिनिधी नोंदणी सुरवात होणार असून 1) आयनॉक्स थिएटर, प्रोझोन मॉल 2)नाथ सीड्स,पैठण रोड 3)एमजीएम फिम्स आर्टस् डिपार्टमेंट, एमजीएम परिसर 4) निर्मिक ग्रुप, व्यंकटेश मंगल कार्यालयासमोर, सुतगिरणी रोड 5) विशाल ऑप्टिकल्स, पवन गॅस एजन्सी समोर, उस्मानपुरा 6) हॉटेल स्वाद, उस्मानपुरा 7) हॉटेल नैवेद्य, सिडको बसस्टॅण्ड 8) साकेत बुक वर्ल्ड, औरंगपुरा 9) जिजाऊ मेडिकल, टि.व्ही. सेंटर या केंद्रांवरती चित्रपट रसिकांना प्रतिनिधी नोंदणी करता येईल.