भाजपकडून राणेंचा पत्ता कट ; विधानपरिषदेसाठी भंडारींना संधी ?

टीम महाराष्ट्र देशा: माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर खाली झालेल्या विधानपरिषदेच्या एका जागेसाठी ७ डिसेंबरला पोटनिवडणूक होत आहे. यासाठी नारायण राणे यांनी भाजपकडून जोरदार फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न केला पण शिवसेनेचा कडवा विरोध पाहता राणेंच हे स्वप्न भंगणार आहे.

आता विधानपरिषदेत एका जागेसाठी भाजपकडून नारायण राणे यांच्या ऐवजी माधव भंडारी याचं नाव जवळजवळ निश्चित मानल जात आहे. काल रात्री झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती आहे.

कालच चंद्रकांत पाटील आणि विनोद तावडे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली या भेटीत शिवसेनेचा माधव भंडारी यांच्या नावाला विरोध नसल्याच समोर आल्याच बोललं जात आहे. त्यामुळे कॉंग्रस सोडून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करणारे नारायण राणे आता काय निर्णय घेतात हे पाहण्यासारख असणार आहे.Loading…
Loading...