प्रत्येकाच्या अकौंटमध्ये १५ लाख जमा करणार, असं मोदी बोललेच नव्हते; माधव भांडारी यांचा दावा

पुणे : सत्तेवर आल्यानंतर प्रत्येक भारतीयाच्या अकौंटमध्ये पंधरा लाख रुपये जमा केले जातील, असे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत दिलेच नव्हते. तसे विधानही केले नव्हते. तसं असेल तर मला त्यांच्या भाषणाची क्लिप दाखवा, असे जाहीर आव्हान भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी दिले.पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे आव्हान दिले आहे.

नेमकं काय म्हणाले माधव भांडारी ?
निवडणूक प्रचारात एखादा मुद्दा उपस्थित केला म्हणजे त्याचं आश्वासन दिलं असं होतं नाही.राहिला प्रश्न 15 लाख रुपयांच्या आश्वासनांचा तर पंतप्रधान मोदीनी असं कुठेही विधान केलेलं नाही, जर असेल तर तशी क्लिप दाखवा.

मंत्र्यांच्या भ्रष्टाचारचे दिलेले पुरावे खोटे असतील तर आम्हाला कोणत्याही चौकात फाशी द्या!