fbpx

‘त्या’ ४ जागा देखील यंदा राखणे कठीण असल्यानेच शरद पवार रिंगणात – माधव भंडारी

sharad pawar and madhav bhandari

टीम महाराष्ट्र देशा : मागील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ज्या ४ जागांवर विजयी झाली होती त्या ४ जागा देखील यंदा राखणे कठीण असल्याचे लक्षात आल्यामुळे स्वतः शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. अशी टीका भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केली आहे.

दरम्यान, २०१४च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ४ खासदार निवडणून आले होते. मात्र आता ते देखील निवडणून येणार नाहीत असा दावा मधाव भंडारी यांनी केला आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देशातील भाजप विरोधी सर्व पक्षांना एकत्र करायला सुरुवात केली आहे. आगामी लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर, त्रिशंकू परिस्थिती उद्भवणार असल्याची खात्री पवारांना आहे. त्यामुळे राज्यासभेपेक्षा आपण लोकसभेत असण गरजेच आहे, अस पवारांना वाटत आहे.

अखेर माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेच निवडणूक लढणार असल्याचे ठरले असून याबबत फक्त अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.माढा लोकसभा मतदारसंघातील पवार यांच्या निवडणुकीची सर्व जबाबदारी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्याकडे दिली असल्याचे आहे.

माढ्याचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी काल नवी दिल्ली येथे शरद पवारांची भेट घेतली होती. मोहिते पाटील यांचे समर्थक हे नाराज झाल्याची चर्चा होती. परंतु त्यांची समजूत काढण्यात आल्याचे सांगण्यात आले.

4 Comments

Click here to post a comment