‘माढा- मावळ महायुतीकडे, बारामती – नांदेडमध्ये आश्चर्यकारक निकाल लागणार’

टीम महाराष्ट्र देशा : माढा आणि मावळ लोकसभा मतदार संघात महायुतीचा झेंडा फडकणार असा विश्वास अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. तसेच भाजपाला ३०० पेक्षा जास्त जागा मिळणार, असेही त्यांनी म्हंटले.

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान काल पार पडले. आता संपूर्ण देशाला २३ मे ला लागणाऱ्या निकालाची प्रतीक्षा आहे. देशात कोण सत्ता स्थापन करणार याची उत्सुकता लागलेली आहे. याचदरम्यान प्रसार माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात आलेल्या एक्झिट पोल नुसार देशात एनडीए सरासरी २७० ते २९० जागा मिळवणार तर कॉंग्रेस सरासरी ११० ते १३० जागा मिळवणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याचबरोबर महाराष्ट्रात महायुती सरासरी ३० ते ४० जागा तर कॉंग्रेस – राष्ट्रवादी आघाडी सरासरी ७ ते १२ जागा मिळवणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Loading...

याचदरम्यान, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी, देशात भाजपाला ३०० पेक्षा जास्त मिळणार आहेत. तसेच राज्यातही महायुतीला ३५ ते ४०जागा मिळणार आहेत. असा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

तसेच माढा आणि मावळ लोकसभा मतदार संघात महायुतीचा झेंडा फडकणार आहे. तर बारामती आणि नांदेड लोकसभा मतदार संघात आश्चर्यकारक निकाल लागणार आहे. असेही त्यांनी म्हंटले. याचबरोबर, नांदेड लोकसभा मतद्दार संघातून कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा निश्चित पराभव होणार असल्याचेही त्यांनी म्हंटले. तसेच विदर्भही डेंजर झोनमध्ये नसल्याचे त्यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, आगामी विधानसभा निवडणुकीबाबतही त्यांनी वक्तव्य केले. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती २०० पेक्षा जास्त जागांवर आपला झेंडा फडकावणार आहे. असेही त्यांनी म्हंटले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
...अन्यथा इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू; असा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाईंवर मनसेच्या रणरागिणीचा प्रतिइशारा
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी
'...यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच'
आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'