माढा लोकसभेसाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख ठरणार जायंट किलर

माढा : (प्रवीण डोके) काही दिवसांपासून माढा लोकसभा मतदार संघात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी चांगलाच संपर्क वाढविला आहे. माढ्यातून भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून सहकारमंत्री देशमुख यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी खुद्द सुभाष देशमुख यांनीच पक्ष जी जबाबदारी देईल ती स्वीकारणार असल्याचे म्हटले आहे . त्यामुळे देशमुख हेच फिक्स उमेदवार असल्याची माहिती मिळाली आहे.

माढा लोकसभा मतदार संघात लोकमंगलच्या माध्यमातून आणि त्यांचा स्वतःचा चांगल संपर्क आहे. त्यामुळे सुभाष देशमुख यांनाच उमेदवारी मिळाली पाहिजे अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांची आहे. देशमुख हे नक्कीच निवडून येतील अशी खात्री भाजप कार्यकर्त्यांना आहे. त्या दृष्टीने सुभाष देशमुख हे सुद्धा लोकसभा मतदार संघात बैठका, गाठी-भेटी घेताना दिसत आहेत. त्यामुळेच भाजप कार्यकर्त्यांना विश्वास आहे कि सुभाष देशमुख हेच उमेदवार असतील.

Loading...

माढा लोकसभा मतदार संघातून २००९ला शरद पवार यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी देशमुखांनी यांनी शरद पवारांना चांगलीच लढत दिली होती. परंतु त्यांचे प्रयत्न कमी पडले. तोच अनुभव घेऊन देशमुख पुन्हा लोकसभेच्या तयारीला लागल्याचे चित्र आहे. २०१४ साली हि जागा स्वभिमानीला सुटली होती. त्यावेळी स्वाभिमानीचे सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीच्या विजयसिंह मोहिते-पाटील यांना टक्कर दिली होती. माळशिरसने तालुक्याने तारल्यामुळे विजयसिंह मोहिते-पाटील पंचवीस हजारने विजयी झाले होते.

येणाऱ्या लोकसभेला हि जागा भाजपकडे राहाणार असल्याने इथे उमेदवार कोण याची चर्चा जोरदार चालू आहे. सध्या सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा माढ्याला संपर्क वाढला आहे. त्यामुळे २००९ प्रमाणे २०१४ला पुन्हा सुभाष देशमुख हे चित्र पहावयास मिळत आहे. लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सुभाष देशमुख यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यांनी मतदारसंघ निहाय बैठका हि घेण्यास सुरुवात केली आहे.

सध्या सहकारमंत्री सुभाष देशमुख हे दक्षिण सोलापूरचे आमदार आहेत. माढा लोकसभा मतदार संघातून देशमुखांनी मैदानात उतरावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. कारण यापुर्वीच्या निवडणूकीचा त्यांना अनुभव आहे. लोकमंगलच्या माध्यमातून हि त्यांचा चांगला संपर्क आहे. तसेच त्यांच्या एवढा मातब्बर उमेदवार सध्या तरी भाजपकडे नाही. त्यामुळे पक्षासाठी माढा लोकसभेची बांधणी करत असतानाच उमेदवारीची माळ सुभाष देशमुख यांच्याच गळ्यात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'
पवारांना सतावतेय पाकिस्तानातील मुस्लिमांची चिंता,म्हणाले....
रोहितदादा पवार मानले राव या माणसाला ! मुंबईच्या डबेवाल्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी झाला ' एक दिवसाचा मुंबईचा डबेवाला '
मनसेच्या झेंड्यावरून वाद,मराठा क्रांती मोर्चा करणार खटला दाखल