माढा लोकसभेसाठी उत्तम जाणकर यांचे नाव चर्चेत !

माढा : माळशिरस तालुक्यातील धनगर समाजचे नेते उत्तम जानकर यांचे नाव सध्या माढा लोकसभेसाठी चर्चेत असल्याचे दिसून येत आहे . उत्तम जाणकर यांचा या भागात चांगला संपर्क आहे. त्यांच्या सामजिक कामातून त्यांनी अनेक कार्यकर्त्ये तयार केले आहेत. याच कार्यकर्त्यांकडून कडून धनगर समाजातील अनेक लोकांकडून जाणकर यांनी लोकसभेला उभा राहण्याची मागणी होत आहे.

उत्तम जाणकर हे धनगर समाजाचे आहेत. या भागात धनगर समज फार मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे जाणकर यांच्या सामाजिक मतांचे समीकरण लक्षात घेता ते सुद्धा लोकसभेच्या निवडणूकीच्या रिंगणात उतरले जाण्याची शक्यता आहे. माढा लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाचे मतदान निर्णायक असून या समाजाची व्होट बँक उत्तम जानकर ज्या पक्षाकडून उभा राहतील त्या पक्षाकडे झुकली जाणार आहे. त्यामुळे जाणकर हे काय निर्णय घेतील यावर बरेच काही अवलंबून आहे. उत्तम जाणकार हे कुठल्या पक्षाकडून निवडणूक लढवणार अद्याप ठरलेले नाही.

उत्तम जाणकर यांचे सर्वच राजकीय पक्षात संबध चांगले आहेत. त्यामुळे माढा लोकसभेसाठी भाजपकडून सहकार मंत्री सुभाष देशमुख हे उभा राहिले नाहीत तर जाणकर यांचा विचार होऊ शकतो अशी माहिती मिळत आहे. परंतु जाणकर हे त्यांना कसा प्रतिसाद देतात यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून हि त्यांचा विचार केला जात असल्याची सध्या चर्चा आहे.

धनगर समाजाकडून आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून उत्तम जाणकर यांनी काहीही झाल तरी माढा लोकसभेला उभाच राहवे अशी इच्छा आहे. जाणकर यांच्या कार्यकर्त्यांकडून तयारी देखील चालू असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे जाणकर हे काय निर्णय घेणार हा आगामी कालच ठरवेल.

माढा लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २०१४च्य  निवडणुकीत जोरदार लढत दिली असली तरी यावेळी परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे यावेळी स्वाभिमानीचा वेगळा उमेदवार आणि भाजपचा वेगळा उमेदवार असण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडूनही भाजपसोबत आघाडी न झाल्यास शिवसेनेचा हि स्वतंत्र उमेदवार दिला जाईल हे निश्‍चित मानले जात आहे. अद्याप तरी आघाडी आणि युती यांच्यात फक्त चर्चाच चालू आहे त्यामुळे येणाऱ्या काळात बरेच चित्र स्पष्ट होईल.

1 Comment

Click here to post a comment
Loading...