fbpx

पवारांचा माढ्यातून डमी अर्ज?, भाजपने सुभाष देशमुखांनाही दिले सज्ज राहण्याचे आदेश

सोलापूर: माढा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून संजय शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिंदे हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, दरम्यान शिंदे यांना पूरक म्हणून खुद्द शरद पवार हे डमी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपने देखील सतर्कता दाखवली असून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना पूरक अर्ज भरण्यास सांगितले आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात दररोज घडणाऱ्या नवीन घडामोडीमुळे निवडणुकीत रंगत आली आहे. सुरुवातीला शरद पवार हेच उमेदवार असतील हे निश्चित झाले होते, मात्र नाट्यमयरित्या घडामोडीमध्ये त्यांनी माघार घेत शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली. पवार यांना राजकारणातील तेल लावलेला पैलवान म्हणून ओळखले जाते, त्यामुळे ते ऐनवेळी कोणता डाव टाकतील हे सांगता येत नाही.

दरम्यान, पवार हे शिंदे यांना डमी अर्ज भरण्याची शंका प्रदेश भाजपला आली, त्यामुळे भाजपने देखील खबरदारीचा उपाय म्हणून सुभाष देशमुख यांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. खुद्द देशमुख यांनी निवडणूक प्रक्रियेचा भाग म्हणून आपण डमी अर्ज भरणार असल्याचे सांगितले आहे.