‘शरद पवारांना निवडून आणा’ विजयदादांचा भर सभेत शिवसेना आमदार नारायण पाटील यांना आदेश

टीम महाराष्ट्र देशा – गेल्यावेळी मला या भागातून कमी मते होती, पण पवार साहेबांना यावेळी कमी मते पडू देऊ नका. त्यांना निवडून आणायचे काम करा अशी माझी तुम्हाला विनंती आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी शिवसेना आमदार नारायण आबा पाटील यांना भर सभेत आदेशवजा विनंती करून कामाला लावले आहे. जिंती येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मी होतो, आता शरद पवार साहेब आहेत , त्यांना २००९ च्या मताधिक्क्याहुन अधिक मतांनी निवडून आणायचं आहे, त्यामुळे आबा तुम्ही साहेबांचं काम करून पवार साहेबांना विजयी करा, असे मोहिते पाटील यावेळी म्हणले.

करमाळयाचे आमदार नारायण आबा पाटील शिवसेनेचे असले तरी ते खरे मोहिते पाटील समर्थक म्हणूनच ओळखले जातात. मागील काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांपुढे बागल गट कार्यकर्त्यांनी ‘राष्ट्रवादीचे खासदार शिवसेनेच्या आमदारांच्या कार्यक्रमाला जातात’ अशी तक्रार केली होती. पण आता आजतर राष्ट्रवादी च्या खासदारांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना निवडणून आणायची जबाबदारीच थेट शिवसेनेच्या आमदारावर टाकली हा तालुका व जिल्ह्यात चर्चेचा विषय झाला आहे.