माढ्याचा तिढा : मोहिते-पाटलांना उमेदवारी दिल्यास माढ्यात पराभव निश्चित ?

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीतून राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी माघार घेतली असून नवीन दमाच्या उमेदवारांना संधी देण्यासाठी मी माघार घेत आहे असे स्पष्टीकरण पवार यांनी दिले. कुटुंबातील सर्वच उमेदवार नकोत असा कुटुंबात विचार झाला. त्यामुळे नवीन दमाच्या उमेदवाराला संधी देवून मी थांबणार आहे. पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेवून पवार यांनी याबाबत ची माहिती दिली.

पवारांनी माघार घेताच खा. विजयसिंह मोहिते-पाटील तसेच रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांचे देखील नाव चर्चेत आहे.

Loading...

राष्ट्रवादी मध्ये असणाऱ्या गटबाजीचा धोका लक्षात घेवून पवारांनी माघार घेतल्याची चर्चा आहे. मोहिते-पाटील घराण्यात जर कोणाला उमेदवारी मिळाली तर या गटाचे विरोधक उघडपणे भाजपला मदत करतील अशी शक्यता निर्माण झाली आहे.या किंगमेकर गटाने जर भाजपला मदत केली तर राष्ट्रवादीचा पराभव निश्चित मानला जात आहे.

राष्ट्रवादीतील गटबाजीचा अनुभव स्वतः पवारांनी घेतला होता. शरद पवार यांनी माढा लोकसभेची निवडणूक लढल्यास मतदारसंघात असणारा अंतर्गत कलह थांबेल असं बोललं जातं होते. सोलापूर जिल्ह्यातील पक्षांतर्गत वाद शमवण्यात यश मिळवलेल्या राष्ट्रवादीला माणमध्ये मात्र हतबल व्हावं लागलं होतं. माण तालुक्यात आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत शरद पवार यांच्या भाषणादरम्यानच पक्षाच्या कार्यकर्त्यांचा जोरदार राडा झाला होता.

जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांनी मोहिते-पाटील विरोधकांची मोट बांधली आहे.या गटाचे नेते संजय शिंदे किंवा सहकारमंत्री सुभाष देशमुख या दोन्ही पैकी एकाला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांचे देखील नाव आता चर्चेत आले आहे. भाजपने योग्य उमेदवार दिल्यास विजयाची माळ भाजपच्या उमेदवाराच्या गळ्यात पडणार असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे भाजप आता कुणाला उमेदवारी देतंय हा देखील मोठा कुतूहलाचा विषय बनला आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
अजित पवारांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचं निधन
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांची गुंडगिरी, 'इंडियन ऑईल'च्या अधिकाऱ्यांना केली हाणामारी
#शिवभोजन : ज्यांची ऐपत आहे त्यांनी 'शिवभोजन' घेऊ नये : अजित पवार
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
सलमान अजूनही कतरीनाच्या प्रेमात स्वत:च दिली कबुली