fbpx

आ. गोरे निंबाळकरांच्या पाठीशी, कॉंग्रेसचे कार्यकर्ते मात्र संजय शिंदेंच्या प्रचारात

टीम महाराष्ट्र देशा : माढा लोकसभा मतदारसंघातील शिंदे विरुद्ध निंबाळकर लढाई जोरदार सुरु आहे, राष्ट्रवादी कॉंगेसचे उमेदवार संजय शिंदे यांना असहकाराची भूमिका घेत माणच्या गोरे बंधूनी भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना पाठींबा दिला आहे, कॉंग्रेसचे आमदार असताना देखील गोरे यांनी भाजप उमेदवाराला पाठींब्या दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आ. जयकुमार गोरे यांनी निंबाळकरांना पाठींबा दिला असला, तरी कॉंग्रेसचे कार्यकर्ते मात्र संजय शिंदे यांच्या प्रचारात दिसत आहेत. गोरे यांच्या निर्णयास विरोध करत कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी शिंदेंचा प्रचार करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. माणमध्ये झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस – कॉंग्रेसच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातील लढाई राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपने प्रतिष्ठेची बनवली आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. तर उद्या १७ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच आयोजन भाजपकडून करण्यात आले आहे. मोदी यांच्या सभेने मतदारसंघात आघाडी घेण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. तर शिंदे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार हे १९ तारखेला माळशिरसमध्ये सभा घेणार आहेत.