आता पवार प्रेम दाखवू नका, माढ्याची लढाई माझ्यासाठी प्रतिष्ठेची- मुख्यमंत्री

cm devendra fadanvis

मुंबई: माढा लोकसभा मतदारसंघातील लढाई आता राष्ट्रवादी विरुध्द भाजप न राहता पवार विरुद्ध फडणवीस बनली आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर संजय शिंदे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली. मागील दोन – तीन वर्ष विश्वासू म्हणून काम करणारे संजय शिंदे याचं राष्ट्रवादीत जाणं फडणवीस यांना रुचलेले नाही. त्यामुळे माढा मतदारसंघात शिंदेंच्या रूपाने शरद पवार याचं पराभव करण्याचा निर्धार देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

फडणवीस यांनी सोमवारी माढा मतदारसंघातील नेत्यांची बैठक घेत ‘आता पवार प्रेम दाखवू नका, माढ्याची लढाई माझ्यासाठी प्रतिष्टेची आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजप उमेदवार विजयी झालाच पाहिजे, असा आदेश स्थानिक नेत्यांना दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीतला आमदार प्रशांत परिचारक, रणजितसिंह मोहिते-पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, आमदार प्रशांत परिचारक, माजी आ.शहाजीबापू पाटील, बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत आदी उपस्थित होते.

दरम्यान, साताऱ्याचे कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आजवर संजय शिंदे यांच्या समविचारी आघाडीत असणारे निंबाळकर हेच भाजपचे उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.