माढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा?

टीम महाराष्ट्र देशा -(प्रवीण डोके) आगामी लोकसभेला माढा मतदार संघातून राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील विरुद्ध जि.प अध्यक्ष संजय मामा शिंदे यांच्यात लोकसभेचा सामना रंगणार असल्याची चर्चा सध्या माढा मतदार संघात जोरात आहे. राष्ट्रवादीकडून मोहिते पाटील यांना लोकसभेचे तिकीट मिळाले तर त्यांच्या विरोधात संजय मामा उभा राहणार असल्याचे समजते आहे.

लोकसभेच्या २०१४साली झालेल्या निवडणुकीत मोदी लाट असताना देखील महाआघाडीचे उमेदवार आणि विद्यमान कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा पराभव करत अटीतटीच्या लढतीत विजयसिंह मोहिते-पाटील विजयी झाले होते. तेव्हापासून हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आणि सर्वात सुरक्षित मतदारसंघ असल्याचे बोलले जाते.

Loading...

येणाऱ्या लोकसभेला जर राष्ट्रवादीने मोहिते-पाटील यांना लोकसभेचे तिकीट दिले तर त्यांच्या विरुद्ध संजय मामा शिंदे शड्डू ठोकून तयार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे माढा लोकसभेला राष्ट्रवादीकडून मोहिते-पाटील यांना तिकीट मिळाले तर मोहिते-पाटील विरुद्ध संजय मामा असा सामना पाहायला मिळण्याची शक्यात आहे.

संजय मामा आणि विजय दादा यांचे राजकीय हाडवैर सर्वश्रुत आहे. असे एकण्यात येत आहे की, काहीही झाल तरी लोकसभेला मोहिते-पाटील यांना निवडून येऊ द्यायचं नाही असा निश्चायचं संजयमामांनी केला आहे. याचाच एक भाग म्हणून काही दिवसांपूर्वी टेंभुर्णीत येथे संजयमामांच्या मळ्यात सांगोल्याचे शहाजीबापू, माळशिरसचे उत्तमराव, बार्शीचे राजाभाऊ, फलटणचे रणजीत नाईक निंबाळकर, म्हसवडचे जयकुमार गोरे, शेखर गोरे हे जमले होते. माढा लोकसभेची गणित यावेळी त्यांनी नव्याने मांडली असल्याचे समजते आहे.

सध्यातरी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पुन्हा लोकसभेची तयारी चालवली आहे. मतदार संघात नेत्यांच्या गाठी भेटी, मतदारांशी चर्चा, विधानसभा निहाय दोरे सध्या मोहिते-पाटील करताना दिसत आहेत. येणाऱ्या निवडणुकीतही मोहिते-पाटील यांनाच तिकीट मिळणार असल्याचे मानून मोहिते-पाटील समर्थक सध्या लोकसभेची तयारी करत आहेत.

या मतदार संघातील उमेदवारीचा तिढा काही केल्या सुटताना दिसत नाही. यातील सस्पेन्स कायम असल्यामुळे कार्येकर्ते कमालीचे अस्वस्थ पाहवयास मिळत आहेत.याबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार काय निर्णय घेणार यावर आता सगळे अवलंबून असणार आहे.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
राजकीय पक्षांचा कोणताही बंद महाराष्ट्रातील व्यापारी यापुढे पाळणार नाहीत
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
शिवसेनेबाबतच्या 'त्या' वक्तव्यामुळे टीकेचे धनी झालेले चव्हाण आता म्हणतात...
लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार !!!
'शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी'
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
उदयनराजे भोसले यांची निर्दोष मुक्तता
कळत नाही राव ! अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत का मुख्यमंत्री : चंद्रकांत पाटील