माढा लोकसभा : पुन्हा लढ ‘बापू’ लढ म्हणण्याची वेळ !

टीम महाराष्ट्र देशा (प्रवीण डोके)- माढा लोकसभेचा तिढा गेल्या अनेक दिवसांपासून काही केल्या सुटताना दिसत नाही. त्यामुळे राष्ट्रवादीकडून २००९ प्रमाणे पुन्हा शरद पवार लढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. तसेच भाजपकडून पुन्हा २००९ प्रमाणेच सध्याचे विद्यमान सहकार मंत्री सुभाष देशमुख हेच उमेदवार असल्याचे निश्चित मानले जात आहे.

माढा लोकसभेला भाजपच्या कार्यकर्त्यांना पुन्हा २००९ प्रमाणे लढ बापू लढ म्हणण्याची वेळ येणार आहे. शरद पवार विरुद्ध सुभाष देशमुख हा सामना परत रंगणार असल्याचे दिसत आहेत. त्यामुळे सोलापूरसह देशातील सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे.

Loading...

माढा लोकसभा मतदार संघामध्ये राष्ट्रवादीचे अनेक गट आहेत. माढा बबनदादा शिंदे, करमाळा श्यामालताई बागल, सांगोला दीपक आबा साळुंके, माळशिरस मोहिते पाटील तर फालटनला रामराजे नाईक निंबाळकर असे गट आहेत. खुद्द शरद पवार असतील तर हे सर्व गट एक दिलाने काम करतील. हे सगळे गट एकत्रित काम करण्यासाठी आणि माढा लोकसभेचा तिढा सुटण्यासाठी पवारांनी तसे संकेत दिले आहेत.

तर दुसरीकडे काही दिवसांपासून माढा लोकसभा मतदार संघात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी चांगलाच संपर्क वाढविला आहे. माढ्यातून भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून सहकारमंत्री देशमुख यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी खुद्द सुभाष देशमुख यांनीच पक्ष जी जबाबदारी देईल ती स्वीकारणार असल्याचे म्हटले आहे . त्यामुळे देशमुख हेच फिक्स उमेदवार असल्याची माहिती सध्यातरी मिळत आहे.

माढा लोकसभा मतदार संघात लोकमंगलच्या माध्यमातून आणि त्यांचा स्वतःचा चांगल संपर्क आहे. त्यामुळे सुभाष देशमुख यांनाच उमेदवारी मिळाली पाहिजे अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांची आहे. देशमुख हे नक्कीच निवडून येतील अशी खात्री भाजप कार्यकर्त्यांना आहे. त्या दृष्टीने सुभाष देशमुख हे सुद्धा लोकसभा मतदार संघात बैठका, गाठी-भेटी घेताना दिसत आहेत. त्यामुळेच भाजप कार्यकर्त्यांना विश्वास आहे कि सुभाष देशमुख हेच उमेदवार असतील.

माढा लोकसभा मतदार संघातून २००९ला शरद पवार यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी देशमुखांनी यांनी शरद पवारांना चांगलीच लढत दिली होती. परंतु त्यांचे प्रयत्न कमी पडले. तोच अनुभव घेऊन देशमुख पुन्हा लोकसभेच्या तयारीला लागल्याचे चित्र आहे. २०१४ साली हि जागा स्वभिमानीला सुटली होती. त्यावेळी स्वाभिमानीचे सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीच्या विजयसिंह मोहिते-पाटील यांना टक्कर दिली होती. माळशिरसने तालुक्याने तारल्यामुळे विजयसिंह मोहिते-पाटील पंचवीस हजारने विजयी झाले होते.

येणाऱ्या लोकसभेला हि जागा भाजपकडे राहाणार असल्याने इथे उमेदवार कोण याची चर्चा जोरदार चालू आहे. सध्या सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा माढ्याला संपर्क वाढला आहे. त्यामुळे २००९ प्रमाणे २०१४ला पुन्हा सुभाष देशमुख हे चित्र पहावयास मिळत आहे. लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सुभाष देशमुख यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यांनी मतदारसंघ निहाय बैठका हि घेण्यास सुरुवात केली आहे.

सध्या सहकारमंत्री सुभाष देशमुख हे दक्षिण सोलापूरचे आमदार आहेत. माढा लोकसभा मतदार संघातून देशमुखांनी मैदानात उतरावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. कारण यापुर्वीच्या निवडणूकीचा त्यांना अनुभव आहे. लोकमंगलच्या माध्यमातून हि त्यांचा चांगला संपर्क आहे. तसेच त्यांच्या एवढा मातब्बर उमेदवार सध्या तरी भाजपकडे नाही. त्यामुळे पक्षासाठी माढा लोकसभेची बांधणी करत असतानाच उमेदवारीची माळ सुभाष देशमुख यांच्याच गळ्यात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे माढा लोकसभा मतदार संघातून २००९ प्रमाणे २०१९ला शरद पवार विरुद्ध सुभाष देशमुख अशी लढत होणार असल्याचे दिसत आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
मोठी बातमी : महाविकास आघाडीचं बिनसलं, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आमने सामने
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ
रावसाहेब दानवेंचे जावई मनसेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव राज ठाकरेंच्या भेटीला
पाच वर्ष सरकार चालवायचं आहे लक्षात ठेवा;शरद पवारांचा संजय राऊतांना सूचक इशारा