माढा लोकसभेचा तिढा कायम; राष्ट्रवादीकडून मोहिते-पाटील की देशमुख?

टीम महारष्ट्र देशा – आगामी लोकसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत. तर दुसरीकडे माढा लोकसभेचा तिढा काही केल्या राष्ट्रवादीकडून सुटेना गेला आहे. राष्ट्रवादीकडून विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील की माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यापैकी कोणाला तिकीट मिळणार याबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे.

काही दिवसांपूर्वी माढा लोकसभेला इच्छुक असणारांना शरद पवारांकडून ‘वेट एंड वॉच’ आदेश आल्याची माहिती महाराष्ट्र देशाला मिळाली होती. काल झालेल्या परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने माढा लोकसभेचा उमेदवार फायनल होणार असल्याची माहिती मिळाली होती. परंतु तास न करत हा सस्पेन्स कायम ठेवला आहे. त्यामुळे माढा लोकसभेला मोहिते-पाटील की देशमुख असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला मात्र पडलेला दिसत आहे.

माढा लोकसभा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. यावेळी राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवार कोण याबाबत मतदार संघात सध्या जोरात चर्चा चालू आहे.
लोकसभेच्या २०१४साली झालेल्या निवडणुकीत मोदी लाट असताना देखील महाआघाडीचे उमेदवार आणि विद्यमान कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा पराभव करत अटीतटीच्या लढतीत विजयसिंह मोहिते-पाटील विजयी झाले होते. तेव्हापासून हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आणि सर्वात सुरक्षित मतदारसंघ असल्याचे बोलले जाते.

सध्या या मतदार संघात भाजपचे प्राबल्य वाढल्यामुळे राष्ट्रवादीची डोकदुखी वाढली आहे. त्यातच विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यावर स्थानिक नेत्यांची असलेली नाराजी. यामुळे या मतदार संघातील उमेदवारीचा तिढा काही केल्या सुटतान दिसत नाही. यातील सस्पेन्स कायम असल्यामुळे कार्येकर्ते कमालीचे अस्वस्थ पाहवयास मिळत आहेत.

सध्या खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पुन्हा तयारी चालवली आहे. अचानक तिकीट कापले गेले तर त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचे समजते आहे. तसेच निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस या भागात चांगलीच मोर्चे बांधणी सुरु केली आहे. पाणी, वीज, रस्ते, दुष्काळ असे विषय सोडवणाऱ्या उमेदवाराला लोकसभेत पाठवले जायला हवे, असे ते सांगताना दिसत आहेत.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार काय निर्णय घेणार यावर आता सगळे अवलंबून असणार आहे.