माढ्यात राष्ट्रवादीनंतर आता कॉंग्रेसला धक्का, कॉंग्रेसचा युवा नेता भाजपच्या वाटेवर

bjp vr congress

टीम महाराष्ट्र देशा; माढा लोकसभा मतदारसंघासाठी अद्याप भाजपकडून उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही, मात्र राष्ट्रवादीची कोंडी करण्यासाठी स्थानिक नेत्यांना पक्षात घेण्याचा सपाटा भाजपने लावला आहे. राष्ट्रवादीचे रणजितसिंह मोहिते पाटील, साताराचे रणजितसिंह निंबाळकर यांच्या पाठोपाठ आता माढ्यातील कॉंग्रेस नेते कल्याणराव काळे भाजप प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे.

कल्याणराव काळे यांना पंढरपूर आणि माढ्यामध्ये मानणारा वर्ग मोठ्या संख्येने आहे. साखर कारखाना तसेच इतर संस्थांच्या माध्यमातून ते काम करत आहेत. माढा मतदारसंघात येणाऱ्या पंढरपूर भागातील ४३ गावांमध्ये काळे यांचा प्रभाव आहे. लोकसभेसाठी भाजप उमेदवार निश्चित नसताना मतदारसंघातील मोठे नेते भाजपमध्ये आणुन राष्ट्रवादीची कोंडी करण्याचा प्रयत्न सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी चालवला आहे.

माढ्यामध्ये राष्ट्रवादीने मोहिते पाटलांचे पारंपारीक विरोधक संजय शिंदे यांना उमेदवार दिली आहे. तर भाजपकडून नेमकी कोणाला उमेदवारी मिळणार हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. यामध्ये साताराचे रणजितसिंह निंबाळकर याचे नाव आघाडीवर आहे. ओं दिवसांपूर्वी खा विजयसिंह मोहिते पाटील यांनाच भाजप उमेदवारी देणार असल्याची चर्चा सुरु झाली, मात्र खुद्द विजयदादा यांनीच आपण लोकसभा लढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.