परंडा विधानसभा मतदारसंघासाठी रासपचा आग्रह – महादेव जानकर

परंडाः परंडा विधानसभेच्या जागेसाठी महायुतीत राष्ट्रीय समाज पक्ष आग्रह धरणार आहे, अशी माहिती दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी दिली. येथील सरगम मंगल कार्यालयात रासपतर्फे कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. त्यावेळी जानकर बोलत होते.

यावेळी पक्षाचे महासचिव तथा शेळी-मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, जिल्हा संपर्कप्रमुख माऊली सलगर, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री ज्ञानेश्वर सलगर, पक्षाचे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ अध्यक्ष गोरख देशमुख, सोलापूर जिल्हा सहसंपर्कप्रमुख रघुनाथ वाघमोडे, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष आश्रुबा कोळेकर, लातूर जिल्हाध्यक्ष दादासाहेब करपे, सोलापूर जिल्हाध्यक्ष सुनील बंडगर, संपर्कप्रमुख रघुनाथ वाघमोडे, जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब घुले, परंडा विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष बप्पाजी काळे, तालुकाध्यक्ष शिवाजी माने, युवा तालुकाध्यक्ष वैभव नलवडे, अमेय पाटील हाडोंग्रीकर, उत्रेश्वर ठवरे, नाना मदने, दादा शिंदे, लिंबराज शिंदे, अण्णा काळे यांची उपस्थिती होती.

Loading...

जानकर म्हणाले, की परंडा विधानसभा मतदारसंघावर पक्षाचा हक्क आहे. ही जागा राष्ट्रीय समाज पक्षाला सोडण्यात यावी, यासाठी महायुतीकडे आग्रहाची मागणी असेल. धनगर आरक्षणाबाबत उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल असल्यामुळे आरक्षणाचा निर्णय सध्या घेता येत नाही; मात्र धनगर समाजाला आरक्षण मिळवून देणार, असे आश्वासन त्यांनी दिले.

मेळाव्यास भूम, परंडा, वाशी तालुक्यांतील महिला, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महायुतीत जागावाटपाची भूमिका ठरत असताना झालेल्या या मेळाव्याला महत्त्व आले होते.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
म्हणून नारायण राणे यांचा जळफळाट होतोय, शिवसेनेचा ढाण्या वाघ राणेंवर गरजला
शरद पवार होणार निवृत्त ? पुन्हा राज्यसभेबाबत सस्पेन्स कायम
टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
चुकीला माफी नाही ! आदित्य ठाकरे यांनी केले दिल्लीतील 'त्या' अधिकाऱ्याला निलंबित
अर्जुन कपूरचा मलायका सोबतच्या नात्याबद्दल बोलतांना मोठा खुलासा ...
'तृप्ती देसाईंवर अश्लील टीका इंदुरीकरांच्या सूचनेनुसारच' ; तासगावात तक्रार