भाजप सरकारविरोधात मदन पाटील युवा मंचची पोस्टरबाजी

सांगली : विविध जीवनाश्यक वस्तूंची वाढती महागाई, दररोजची इंधन दरवाढ, काळा पैसा व नोटाबंदी यासह सर्वच निर्णयामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आली आहे. सर्वसामान्यांचा हा संताप मदन पाटील युवा मंचने सांगली शहरातील मुख्य चौकात उभारलेल्या डिजीटल ङ्गलकाद्वारे व्यक्त करून केंद्र व राज्यातील भाजप सरकारविरोधात अनोखा निषेध नोंदविला. मदन पाटील युवा मंचचा हा अनोखा उपक्रम सांगलीकरांसाठी चांगलाच कुतुहालाचा विषय ठरला आहे. मदन पाटील युवा मंचचे सांगली जिल्हा अध्यक्ष नगरसेवक संतोष पाटील, कार्याध्यक्ष आनंदा लेंगरे व सचिव प्रविण उर्ङ्ग लिंगाप्पा निकम यांच्या भन्नाट संकल्पनेतून सर्वसामान्य जनतेचा आवाज डिजीटल ङ्गलकावर आला आहे. त्यासाठी मदन पाटील युवा मंचचे सांगली महापालिका क्षेत्र अध्यक्ष शीतल लोंढे, सांगली ग्रामीण जिल्हा अध्यक्ष सुधाकर नवाळे, दिलीप जाधव, अमोल डांगे, दिनेश सादिलगे, इरङ्गान मुल्ला, सचिन कांबळे, दिनेश घुडे, स्वप्निल ऐवळे, विजय मोदी, मयूर बांगर व प्रकाश मुळके यांनी पुढाकार घेत हे डिजीटल ङ्गलक उभारले आहे. मदन पाटील युवा मंचच्या पुढाकाराने सांगली शहरातील मुख्य वर्दळीच्या कॉलेज कॉर्नर परिसरात हा डिजीटल ङ्गलक उभारण्यात आला आहे. त्यात गत तीन वर्षातील केंद्र व राज्यातील भाजप सरकारचा उलटा कारभार अधोरेखित करणारा अभिनंदन… आभार… धन्यवाद… या शीर्षकाखालील मजकुरातून सर्वसामान्य जनतेच्या भावना परखडपणे मांडल्या गेल्या आहेत. केंद्रातील तत्कालीन कॉंग्रेस सरकारला घरगुती गॅस सिलेंडर महाग करायला जमले नाही, ते भाजप सरकारने करून दाखविले, परदेशातून काळा पैसा आणून प्रत्येकाच्या नावावर १५ लाख रूपये जमा केले, आर्थिक विकास दर (जीडीपी) दोन टक्क्यांनी कमी केला, कच्च्या तेलाचा दर रसातळाला जाऊनही डिझेल- पेट्रोलचे दर कमी न करणे, नोटाबंदीच्या नावाखाली जनतेचा बळी घेणार्‍या व मेक इन इंडियाचे गाजर दाखविल्याबाबत, अशा उपाहासात्मक शब्दात मदन पाटील युवा मंचने भाजप सरकारचे जाहीर अभिनंदन करीत आभार व्यक्त करून धन्यवाद देऊन अनोखा निषेध नोंदविला आहे. हेच का तुमचे अच्छे दिन? अशी रोखठोक परखड विचारणा करीत मदन पाटील युवा मंचने सर्वसामान्य जनतेच्या भावनांना ठळक शब्दात मोकळी वाट करून दिली आहे. या डिजीटल ङ्गलकावरील मजकूर सर्वसामान्यांच्या मनाला भिडणारा ठरत असल्याने या ङ्गलकावरील मजकूर पाहण्यासाठी सांगलीकरांची मोठी गर्दी होत आहे. परिणामी या ऐन वर्दळीच्या मुख्य चौकात वारंवार वाहतुकीची कोंडी होऊ लागली आहे. या अनोख्या निषेधाचे सांगलीकरांतून कौतुक होत असून मदन पाटील युवा मंचच्या या डिजीटल ङ्गलकाची सांगली शहरातील मुख्य चौकाचौकात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.

You might also like
Comments
Loading...