मैदान मारल पवारांच्या पैलवानानं, चर्चा मात्र संभाजी भिडे गुरुजींची!

s bhide

सांगली : कोरेगाव भीमा हिंसाचारानंतर संपूर्ण राज्यभर चर्चेत असलेले संभाजी भिडे गुरुजी चांगलेच चर्चेत आले. तसेच धार्मिक राजकारणाला वेगळ वळण लागल होत. आत पुन्हा गुरुजी चर्चेत आले पण ते कुस्तीच्या मैदानावर. त्यांची सांगलीत पिंजऱ्यातील कुस्तीच्या मैदानावरील उपस्थिती चांगलीच चर्चेची ठरली. त्यामुळे मैदानावर फक्त संभाजी भिडे व हिंदू धर्माच्या घोषणा होत्या.

सांगलीत प्रथमच लोखंडी पिंजऱ्यात उपमहाराष्ट्र केसरी साताऱ्याच्या किरण भगत विरुद्ध साडेसहा फूट उंच डब्लूडब्ल्यूई चॅंपियन भारत केसरी मनजितसिंग यांच्यात काटाजोड लढत रंगली. किरणने अवघ्या सहाव्या मिनिटाला मनजितला दम दिला. पण या कुस्ती पेक्षा मैदानावर संभाजी भिडे उपस्थितीची चर्चा रंगली.

साताऱ्याच्या किरण भगत हा पवारांनी दत्तक घेतलेला पैलवान आहे. तब्बल ७० वर्षांनंतर देशात प्रथमच सांगलीत डॉ. आंबेडकर स्टेडियममध्ये लोखंडी पिंजऱ्यात कुस्ती झाली. या संदर्भात गेले आठवडाभर शहरभर डिजिटल फलक झळकले होते. या फलकावर खासदार उदयनराजे भोसले, कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांच्यासोबतच संभाजी भिडे यांचे छायाचित्र होते.

पैलवान कुस्तीप्रेमी संस्थेचे संस्थापक मारुती जाधव यांनी मैदानासाठी पुढाकार घेतला होता. त्यांनीच संभाजीरावांना मैदानातून फिरवून आणले. कुस्तीरसिकांनी त्यांनी अभिवादन केले. त्यावेळी मोठा जल्लोष झाला. त्यांच्या हस्ते मैदानाचे उद्घाटन झाले. मुख्य एकमेव कुस्ती रात्री ८.३८ मिनिटांनी सुरु झाली आणि त्यानंतर अवघ्या सहा मिनिटात म्हणजे ८ वाजून ४४ मिनिटांनी कुस्ती निकाली झाली. किरण भगतने बलाढ्य देहाच्या मनजितला एकलंगी पलटी डावावर चित केले. विजेत्याला चार लाखांचे तर उपविजेत्याला दोन लाखांचे पारितोषक देण्यात आले.