M Aadhaar- अँड्रॉइड युजर्ससाठी एमआधार अ‍ॅप

m aadhaar app

युआयएडीआयने देशातल्या अँड्रॉइड युजर्ससाठी एमआधार हे अ‍ॅप लाँच केले आहे. गुगल प्ले स्टोअरवर तुम्ही ते डाउनलोड करू शकता.

भारतीय नागरिकांना आता शासकीय सेवांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. हे कार्ड वापरणे हे काहींना असुविधेचे ठरते. यासाठी एमआधार अ‍ॅपचा वापर ती व्यक्ती करू शकते.  डिजीटल पध्दतीने आधार आपल्या स्मार्टफोनमध्ये सोबत ठेऊ शकणार आहे. यात कोणत्याही आधार कार्ड युजरची नाव, पत्ता आदींसह सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळू शकते. महत्वाची बाब म्हणजे कुणाचाही बायमेट्रीक डाटा तसेच अन्य माहिती गोपनीय ठेवण्याचा पर्यायदेखील यात देण्यात आला आहे. यासाठी यात बायोमेट्रीक लॉक/अनलॉक या ऑप्शनपैकी एकाची निवड करावी लागेल. यात क्युआर कोड आणि पासवर्डचे सुरक्षा कवच असणार्‍या ई-केवायसीची सुविधा देण्यात आली आहे. सध्या हे अ‍ॅप प्रयोगात्मक अवस्थेत असल्याचे युआयएडीआयतर्फे जाहीर करण्यात आले आहे. याची पुर्ण आवृत्ती तसेच आयओएस प्रणालीसाठी हे अ‍ॅप लवकरच सादर करण्यात येणार आहे.

हे वाचा रामनाथ कोविंद भारताचे १४ वे राष्ट्रपती