चीते की चाल, बाज की नजर और धोनी की कीपिंग पर संदेह नहीं करते !

टीम महाराष्ट्र देशा: भारत विरुध्द श्रीलंका हा तिसरा एकदिवसीय सामना विशाखापट्टनम येथे खेळला जात आहे. हा सामना मालिका विजयासाठी साठी दोन्ही संघासाठी निर्णायक आहे त्यामुळे या सामन्यात रंगत आली आहे आणि अशा सामन्यात भारतासाठी नेहमी धाऊन येतो तो महेंद्रसिंग धोनी…

पहिल्या इनिंग श्रीलंकेचा आघाडीचा फलंदाज उपुल थरंगा भारतीय गोलंदाजांचे अक्षरशः वाभाडे काढत होता. भारतीय गोलंदाजांची कोणतीच चाल त्याला बाद करण्यात यशस्वी होत नव्हती. तेव्हा कर्णधार रोहित शर्माने पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी युवा कुलदीप यादवला आमंत्रित केलं. २८ वे षटक पहिला चेंडू लेफ़्ट आर्म ओवर द विकेट चेंडू ऑफ स्टम्पच्या लाईनमध्ये पडून टर्न झाला. भलत्याच फॉर्मात असणाऱ्या उपुल थरंगाला शॉट खेळायला चुकला आणि चेंडू मिस होऊन धोनीच्या हातात पोहचला. धोनीने बॉल पकडला एक सेकेंद थांबून ‘बेल्स’ स्टंपपासून बाजूला केल्या. थरंगाने परत ‘क्रीज’मध्ये परतण्याचे अतोनात प्रयत्न केले खरे पण जेव्हा तिसऱ्या पंचाचा निर्णय आला तेव्हा थरंगाचा पाय लाईनवर होता आणि नॉट आऊट राहण्यासाठी पाय लाईनच्या आत हवा असतो. इथेच थरंगा चुकला आणि पुन्हा एकदा मि.कुल माही सरस ठरला.

bagdure

You might also like
Comments
Loading...