‘झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले’

टीम महाराष्ट्र देशा : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून बराच काळ दूर आहे. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनी एकही सामना खेळलेला नाही. त्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगत आहेत. यातच गुरूवारी BCCI ने या संबंधातील वार्षिक करारबद्ध केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली त्यामध्ये महेंद्रसिंग धोनी याला या करारात कोठेही स्थान देण्यात आलेले नाही.

ऑक्टोबर २०१९ ते सप्टेंबर २०२० या कालावधीसाठी क्रिकेटपटूंना देण्यात येणारे मानधन बीसीसीआयने जाहीर केले. यात ग्रेड ‘ए प्लस’ मध्ये म्हणजे सर्वाधिक मानधन मिळणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये तिघांचा समावेश करण्यात आला आहे. गेल्या वर्षी धोनीला A श्रेणीत स्थान देण्यात आले होते, पण यंदा मात्र त्याला कोणत्याही श्रेणीत स्थान देण्यात आलेले नाही.

Loading...

क्रिकेटपटूंना देण्यात येणाऱ्या मानधनाचे ग्रेड ‘ए प्लस’, ‘ए’, ‘बी’ आणि ‘सी’ असे चार प्रकार करण्यात आले आहेत. ‘ए प्लस’मध्ये असलेल्या क्रिकेटपटूंना ७ कोटी, ‘ए’ ग्रेडमधील खेळाडूंना ५ कोटी, ‘बी’ ग्रेडमधील खेळाडूंना ३ कोटी तर अखेरच्या ‘ग्रेड सी’मधील खेळाडूंना १ कोटी मानधन दिले जाईल.

दरम्यान, क्रिकेटनंतर धोनी राजकारणात सक्रिय होईल, असाही अंदाज बांधला जात होता. भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी काही महिन्यांपूर्वी धोनीची भेटही घेतली होती. त्यामुळे धोनी भाजपाचा झेंडा हाती घेईल असे वाटले होते आणि तशा बातम्याही आल्या होत्या. पण, तसे काहीच झाले नाही.त्यामुळेच धोनीला बीसीसीआयने सेंट्रल करारातून वगळल्याचा दावा काँग्रेसच्या सोशल मीडिया समन्वयक गौरव पांधी यानं केला आहे.

झारखंड निवडणुकीत भाजपाला सपाटून मार खावा लागला आणि त्यांची सत्ता गेली. झारखंड मुक्ती मोर्चा ( 30), काँग्रेस ( 16), राष्ट्रीय जनता दल ( 1) आणि राष्ट्रवादी काँग्रेस ( 1) यांच्या आघाडीनं 48 जागा जिंकून सत्ता स्थापन केली. भाजपाला 79 पैकी 25 जागाच जिंकता आल्या.त्याचा राग भाजपानं धोनीवर काढल्याचा दावा पांधी यांनी केला आहे.

ते म्हणाले, ”धोनीनं झारखंड निवडणुकीत भाजपात प्रवेश करावा आणि निवडणुक लढावी, यासाठी प्रयत्न सुरू होते. पण, धोनीनं त्यास नकार देत क्रिकेट खेळण्यास प्राधान्य दिले. त्यानंतर त्याला प्रचारासाठी विचारण्यात आले आणि तेव्हाही त्यानं नकारच दिला. त्याचा परिणाम म्हणून बीसीसीआयनं त्याला सेंट्रल करारातूनच वगळले?” विशेष म्हणजे अमित शाह यांचे पुत्र जय शाह हे बीसीसीआयचे सचिव आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
...तर 'नितेश राणे' करणार मुख्यमंत्री 'उद्धव ठाकरें'चा सत्कार