खासदार संभाजी राजेंना केंद्रात मंत्रीपद ? 

केंद्र सरकारचा बहुचर्चित मंत्रीमंडळ विस्तार रविवारी म्हणजेच ३ सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता सूत्राकडून देण्यात आली आहे. या विस्तारत महाराष्ट्रामधून नुकतेच राष्ट्रपती नियुक्त खासदार झालेले छत्रपती संभाजी राजे यांची वर्णी लागण्याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे.

२०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका पाहता हा मंत्रिमंडळ विस्तार  महत्वपूर्ण मानला जात आहे. त्यामुळेच काही मंत्र्यांना नारळ तर राजकीय आणि जातीय समतोल साधत नव्यांना संधी दिली जाणार आहे.

महाराष्ट्रात मराठा समाजात उसळलेला असंतोष आणि सरकार विरोधात मराठा समाजात निर्माण झालेली चिड शमवण्यासाठी समाजाचे नेतृत्व करणारे खासदार संभाजी राजे यांना मंत्रीपद दिल जाऊ शकत. नुकतच मुंबईत झालेला विराट मराठा क्रांती मोर्चा शांततेत पार पडण्यासाठी संभाजी राजेंनी महत्वाची भूमिका पार पडली होती.