fbpx

…तर मी नमस्कार करून माझ्या मार्गाने जाईल ; भाजपच्या जुन्या मित्राचा निर्वाणीचा इशारा

भाजप

टीम महाराष्ट्र देशा : मी कधी मित्र धर्म सोडलेला नाही..जर त्यांनी माझे ऐकले नाही तर मी नमस्कार करून माझ्या मार्गाने जाईल, अशा शब्दांत प्रदेशचे मुख्यमंत्री आणि टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी आक्रमक पवित्रा घेत भाजपला निर्वाणीचा इशारा दिला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे दोन सदस्य पक्ष भाजपा आणि तेलुगू देशम पक्षात (टीडीपी) गेल्या काही दिवसांपासून तणावाचे वातावरण आहे. आंध्र प्रदेशकडे दुर्लक्ष केल्याने ते नाराज आहेत.

दरम्यान, केंद्र सरकारकडून राज्याला देण्यात आलेली आश्वासने पूर्ण होत नसल्यामुळे लोकांमध्ये असंतोष पसरत असल्याचे काही दिवसांपूर्वी चंद्राबाबूंनी म्हटले होते. सीआयआयच्या परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले होते. टीडीपीने अर्थसंकल्पात आंध्र प्रदेशला जास्त महत्व न दिल्यामुळे संसदेच्या कामकाजात अडथळा आणला होता. आता टीडीपीच्या नाराजामुळे केंद्र सरकारने अर्थसंकल्पानंतर आंध्र प्रदेशसाठी वाढीव निधी मंजूर केला होता. पण त्यावर टीडीपी समाधानी नसल्याचे दिसते