fbpx

Reliance LYF C459 – रिलायन्स एलवायएफ सी४५९ स्मार्टफोन

रिलायन्स कंपनीने फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्क सपोर्ट असणारा एलवायएफ सी४५९लाँच केला असून कंपनीच्या संकेतस्थळावर याची लिस्टींग करण्यात आली आहे.रिलायन्स एलवायएफ सी४५९ या स्मार्टफोनची किंमत ४,६९९ रूपये असून यात फोर-जी व्हिओएलटीई व एलटीई नेटवर्क सपोर्टसह वाय-फाय, जीपीएस, ब्ल्यु-टुथ, मायक्रो-युएसबी आदी कनेक्टिव्हिटी व प्रॉक्झीमिटी, अ‍ॅक्सलेरोमीटर, अँबियंट लाईट आदी सेन्सर्सचा समावेश आहे.

४.५ इंच आकारमानाचा क्षमतेचा डिस्प्ले असून यावर २-डी ग्लासचे संरक्षक आवरण असेल. क्वालकॉमच्या १.३ गेगाहर्टझ स्नॅपड्रॅगन २१० एमएसएम८९०९ हा प्रोसेसर, रॅम एक जीबी आणि अंतर्गत स्टोअरेज आठ जीबी असून मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ते १२८ जीबीपर्यंत वाढवता येणार आहे.

रिलायन्स एलवायएफ सी४५९ ऑटो-फोकस आणि एलईडी फ्लॅश व स्माईल डिटेक्शन, गेझ डिटेक्शन, ब्लिंक डिटेक्शन, पॅनोरामा, रेड आय डिटेक्शन, ऑटो फ्रेम रेट, कंटिन्युअस ऑटो-फोकस आदी फिचर्ससह यातील मुख्य कॅमेरा ५ मेगापिक्सल्सचा तर फ्लॅशयुक्त २ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा असेल. हे मॉडेल अँड्रॉइडच्या ६.१ मार्शमॅलो आवृत्तीवर चालणारे आहे. या मॉडेलमध्ये २,००० मिलीअँपिअर क्षमतेची लिथियम-आयन बॅटरी प्रदान करण्यात आली आहे.