Share

IND vs SA । लुंगी एनगिडीने पर्थमध्ये केला कहर, भारताच्या चार महत्वाच्या खेळाडूंच्या घेतल्या विकेट

IND vs SA । नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रविवारी ३० ऑक्टोबर रोजी टी-२० विश्वचषकातील ३० वा सामना सुरु आहे. पाकिस्तान आणि नेदरलँड्सला पराभूत केल्यानंतर भारतीय संघ बलाढ्य आफ्रिकन संघाला हरवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय संघात अक्षर पटेलच्या जागी दीपक हुडाची निवड करण्यात आली आहे. त्याचवेळी फिरकी गोलंदाज तबर्जे शम्सीच्या जागी लुंगी एनगिडीचा दक्षिण आफ्रिकेच्या संघात समावेश करण्यात आला आहे. कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी आणि एनरिक नॉर्सिया हे त्रिकूट पर्थच्या खेळपट्टीवर कहर करू शकतात. त्याचवेळी फिरकी गोलंदाज तबर्जे शम्सीच्या जागी लुंगी एनगिडीचा दक्षिण आफ्रिकेच्या संघात समावेश करण्यात आला आहे.

या सामन्यात खेळताना लुंगी एनगिडीने कहर केला आहे. त्याने सुरवातीला एकापाठोपाठ एक दोन मोठे धक्के देत भारताला अडचणीत आणले, रोहित शर्मा पाठोपाठ राहुललाही बाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर आता भारतीय टीमला विराट कोहलीकडून मोठी अपेक्षा होती. मात्र एनगिडी विराट कोहली झेलबाद केले. कोहलीची विकेट हि भारतासाठी सर्वात मोठा धक्का मनाला जात आहे.

एनरिक नॉर्सियाने भारतीय संघाला चौथा धक्का दिला आहे. त्याच्या चेंडूवर दीपक हुडाने खाते न उघडता विकेटच्या मागे क्विंटन डी कॉककडे झेलबाद केले. यानंतर हार्दिक पांड्या फलंदाजीसाठी मैदानात उतरला. मात्र त्यालाही या सामन्यात लुंगी एनगिडीने कागिसो रबाडाकडे झेलबाद केले. यानंतर भारतीय संघाचे ४ महत्वाचे फलंदाज एनगिडीने बाद केले.

महत्वाच्या बातम्या :

IND vs SA । नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रविवारी ३० ऑक्टोबर रोजी टी-२० विश्वचषकातील ३० वा …

पुढे वाचा

Cricket India Marathi News Sports

Join WhatsApp

Join Now