कानपूर : आयपीएल (IPL Retained Players 2022) 2022 पूर्वी, फ्रँचायझींना 30 नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करायची आहे. परंतु त्यापूर्वी पंजाब किंग्ज (Punjab Kings) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH Team) संघाने बीसीसीआयकडे एक तक्रार केली आहे, ही तक्रार लखनऊ (Lucknow Team) संघाशी संबंधित आहे.
आगामी हंगामात, स्पर्धेत आठ चे 10 संघ वाढतील, ज्यासाठी बीसीसीआयने लखनऊ आणि अहमदाबाद संघांची घोषणा केली आहे. आता असे समोर आले आहे की पंजाब आणि हैदराबादने लखनऊ संघावर चुकीच्या पद्धतीने खेळाडूंना आपल्या संघात समाविष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.
बीसीसीआयही या प्रकरणाची चौकशी करत आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानेही याला दुजोरा दिला आहे. लखनऊ संघाबाबत दोन फ्रँचायझींनी तक्रार केल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले आहे.
बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने एका वृत्ताला दिलेल्या माहितीनुसार, ‘आम्हाला या संदर्भात कोणतीही लेखी तक्रार प्राप्त झालेली नाही, परंतु हो दोन फ्रँचायझींनी आमच्याकडे लखनऊ संघाने चुकीच्या पद्धतीने खेळाडूंना ठेवल्याबद्दल तक्रार केली आहे. आम्ही या प्रकरणाची चौकशी करत असून, आरोप सिद्ध झाल्यास आवश्यक ती कारवाई करू. असे स्पष्टीकरण अधिकाऱ्याने दिले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- …तर आरोग्याची बंधने पाळावीच लागतील- मुख्यमंत्री ठाकरे
- दक्षिण आफ्रिकेतून स्वदेशी परतलेल्या व्यक्तीला नव्या व्हेरिएंटचा संसर्ग?
- कायदे मंजूर करताना परिणामांचा विचार न केल्याने समस्या- एन.व्ही.रमण
- …तर राजकीय विरोधकांवर टीका हाच एकमेव कार्यक्रम कसा ठरू शकतो?- संजय राऊत
- ‘काँग्रेसची सूत्रे गांधी घराण्याकडे असणे व भाजपची सूत्रे पंतप्रधानांच्या मुठीतल्या व्यक्तीकडे असणे हे सारखेच’
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<