fbpx

गायकवाड-काकडेंच्या एन्ट्रीमुळे काँग्रेसमधील इच्छूकांमध्ये पसरली अस्वस्थता

sanjay kakde

पुणे : भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे आणि संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड काँग्रेसकडून उमेदवारीसाठी प्रयत्न करत असताना या दोन्ही नावाला कॉंग्रेस निष्ठावंतांनी आपला विरोध दर्शविला आहे. पुण्यातून काँग्रेस पक्षाच्या कोणालाही उमेदवारी द्या आम्ही एकदिलाने काम करून त्याला निवडून आणू, मात्र बाहेरील उमेदवार आमच्यावर लादू नका अशा स्वरुपाच्या भावना शहर काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर व्यक्त केल्या. पुण्यासह सांगलीतील इच्छूकांची बैठक चव्हाण यांनी पुण्यात घेतली. पुण्यामध्ये काँग्रेकडून बाहेरच्या उमेदवाराला संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेसमधील इच्छूकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या आदेशावरून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी शुक्रवारी सकाळी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीला पाटील यांच्यासह पृथ्वीराज चव्हाण निरीक्षक म्हणून उपस्थित होते.

या बैठकीला आमदार विश्वजीत कदम, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार मोहन जोशी, अभय छाजेड, अरविंद शिंदे या इच्छुकांसह गांधी यांना पत्र पाठवणारे माजी आमदार ऊल्हास पवार, प्रदेश कार्यकारिणीचे संजय बालगूडे, आबा बागूल, कमल व्यवहारे, नीता रजपूत, गोपाळ तिवारी, आदी उपस्थित होते. आमच्यापैकी कुणालाही द्या पण बाहेरचा उमेदवार नको, अशी थेट मागणी पुणे उपस्थित नेत्यांनी केली.