ठोस पुरावे नाहीत,न्या. लोया प्रकरणाचा पुन्हा तपास होणार नाही : गृहमंत्री

टीम महाराष्ट्र देशा- न्या. लोया यांच्या मृत्यूप्रकरणाचा पुन्हा नव्यान तपास करण्यात येणार नसल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याविषयी माहिती दिली. न्या. लोयाप्रकरणी ठोस पुरावे नसल्याचे महत्त्वाचे वक्तव्य  गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.

देशमुख म्हणाले,’अनेक लोकांनी मला फोन करुन त्यांच्याकडे नवीन पुरावे असल्याचा दावा केला. मी त्यांना माझ्याकडे या आणि पुरावे द्या असे म्हटले होते. पण एकही ठोस पुरावा समोर आला नाही.’ देशमुख यांनी यापूर्वी त्यांच्याकडे ठोस पुरावे आल्यास या प्रकरणाची पुन्हा चौकशी करु असे म्हटले होते.

१ डिसेंबर २०१४ रोजी न्यायमूर्ती बी.एच.लोयां आपल्या सहकाऱ्याच्या मुलीच्या लग्नासाठी नागपूरला गेले होते तेंव्हा तिथं त्यांचा मृत्यू झाला. परंतु कॅराव्हान मॅगेझिननं ४ महिन्यांपूर्वी न्यायमूर्ती बी.एच.लोयां मृत्यू संशयास्पद असल्याची बातमी दिली होती आणि देशभर खळबळ उडाली होती. त्यामुळे न्यायमूर्ती बी.एच.लोयांच्या मृत्यूप्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी एक याचिका सुप्रीम कोर्टात सादर करण्यात आली होती.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी न्यायमूर्ती बी.एच.लोयांच्या मृत्यूप्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी एक याचिका सुप्रीम कोर्टात सादर करण्यात आली होती. त्या याचिकेवर तेव्हाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती अजय खानविलकर यांच्या खंडपीठाने निर्णय दिला होता. न्यायमूर्ती लोयांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी होणार नाही असं स्पष्ट केलं होते.