fbpx

मेल्यानंतर आम्हाला लांब करू नका’, झाडाला गळफास घेऊन प्रेमी युगुलाची आत्महत्त्या !

टीम महाराष्ट्र देशा : ‘जिवंत असताना तर आम्हाला एक होऊ दिले नाही मेल्यानंतर आम्हाला लांब करू नका’ अशी चिट्ठी लिहून प्रेमप्रकरणातून प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मनमाडमध्ये घडला आहे. घरच्यांनी लग्नास नकार दिल्याने निराश झालेल्या प्रेमी युगुलाने गळफास घेऊन आत्महत्त्या केली आहे. सटाणा तालुक्यातील लाखमापूरमधील ही घटना आहे. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

एकाच समाजाचे असताना केवळ मुलाचे शिक्षण कमी असल्या कारणावरून घरच्यांनी लग्नास नकार दिला. त्यामुळे निराश होऊन प्रेमी युगुलाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्त्या केली. आत्माराम दळवी आणि सुनिता गांगुर्डे असं या प्रेमी युगुलाचे नाव आहे. निराशेमध्ये या दोघांनीही आपलं आयुष्य संपवलं आहे.

आत्मारामचं ४थी पर्यंत शिक्षण झालं होतं. तर सुनिता ही एफ.वाय.बीए.चं शिक्षण घेतं होती. एकाच समाजाचे आणि शेजारी राहणारे आत्माराम आणि सुनिताचे प्रेमसंबंध होते. परंतू शैक्षणिक तफावतीमुळे दोघांच्या घरच्यांचा लग्नास विरोध होता. त्यामुळे त्यांनी आत्महत्त्या केली.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी दोघांनी चिठ्या लिहल्या होत्या. त्यात आमच्या मृत्युस कुणालाही जबाबदार धरू नका असं लिहण्यात आलं होतं. बरं इतकंच नाहीतर तर, ‘जिवंत असताना आम्हाला एकत्र येऊ दिलं नाही पण मेल्यानंतर आम्हाला एकाच ठिकाणी ठेवा. आमच्या आत्म्याला शांती लाभेल’ असंही चिठ्ठीत लिहण्यात आलं आहे.

 

या संपूर्ण प्रकराणाची माहिती मिळताच पोलिसांनी या प्रकरणाच कसून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तर पोलीस आता या प्रकरणात कसून चौकशी करत आहेत.