जुळून येती रेशीमगाठी : मुख्यमंत्री आणि अमृता वहिनी यांच्या लग्नाची गोष्ट

कल्याणी कमलाकर नागोरे/प्रतिनिधी : पुरुष कितीही कणखर दिसत असला तरी, मनाच्या एका कोपऱ्यात तो एक प्रेमळ बाप, मुलगा, भाऊ, पती, असतोच. मग तो एखादा भाजीपाला विकणारा असो की, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री. नागपूरचे पुत्र व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिसायला शांत , निडर, कणखर, असले तरी कुठेना कुठे एक रोमांटीक हिरो त्यांच्यात ही दडला आहेच की ! याची ग्वाही आम्ही नाही, खुद्द त्यांचा अर्धांगिनी अमृता फडणवीस यांनी दिली आहे.

आता या दोघांचं मिलन नक्की झालं कसं?

ते झालं असं की देवेंद्र व अमृता यांचा मित्र शैलेश जोगळेकर याचा घरी या दोघांची भेट झाली. सुरूवातीला राजकारणी म्हणजे वाईट प्रवृत्तीचे नीच लोक असा अमृता यांचा समज होता. पण देवेंद्र यांच्या सोबतच्या एका तासाच्या भेटीतच अमृताचा हा गैरसमज दूर झाला .देवेंद्र यांची आवडती अभिनेत्री म्हणजे काजोल. ते जेव्हा पहिल्यांदाच अमृता यांना भेटले होते तेव्हा, ‘तू काजोल सारखी दिसतेस, असे म्हणतचं त्यांनी प्रपोज केले. आणि त्यांनी अमृताला इम्प्रेस केले. त्यानंतर तिनेदेखील देवेंद्रशी लग्न करण्याचे ठरवले.

अमृताचे आई-वडील दोघे नागपुरातले मोठे सर्जन त्यामुळे तिच्या घरात संकुचित प्रवृतीचा प्रश्नचं येत नाही ! नागपूरचे नामवंत डॉ. चारू रानडे आणि नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. शरद रानडे यांना कधी आपल्या मुलीच्या पसंतीवर प्रश्न नव्हता, पण देवेंद्र मधला गुण त्यांनी लग्नात ओळखला. यावेळी देवेंद्र आमदार म्हणून दुसर्यांदा निवडून आले व लग्नाची तारीख ठरली. लग्न ठरले यावेळी लग्नाला ब्राह्मण पद्धतीने अवघ्या शे -दोनशे लोकांना निमंत्रण देण्यात आले होते. पण शे-दोनशे नव्हे तर तब्बल वीस-तीस हजार लोक या लग्नात सहभागी झाले होते. आपल्या जवयावरील लोकांचे प्रेम पाहून त्यांना देवेंद्र कोण आहे ते समजले.

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, असे म्हटले जाते. जगात असे अनेक पुरुष आहेत की, त्यांना ‘लेडी लक’ लाभले आहे. मग त्याला आपले युवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील याला अपवाद नाहीत. वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी देवेंद्र नागपूरचे महापौर बनले. देशातील सर्वात तरूण महापौर म्हणूनही त्यांचा गौरव झाला होता. मुख्यमंत्र्यांच्या यशस्वी राजकारणामागे त्यांच्या पत्नी अमृता यांचा मोठा वाटा आहे.

Loading...

हे तर झालं दुसऱ्यांसाठी –

अमृताने कितीतरी वेळेस सगळ्यांसमोर आपल्या प्रेमाची कबुली कधी लाजून तर कधी गाणं म्हणून दिली आहे. पण देवेंद्र एकदम उलटे… त्यांचं अमृतावरील प्रेम त्यांच्या डोळ्यातून दिसते. ती गाणं म्हणायला लागल्यावर फक्त गालातल्या गालात हसून ते आपल्या प्रेमाची कबुली देतात. कोणता ड्रेस अमृताने घातला ? कोणती हेअर स्टाईल तिने केली ? तिचे वजन वाढले का कमी झाले ? याकडे देवेंद्रचे कधीच लक्ष नसते. असं कस ? हे कोणतं प्रेम ? हे पण प्रेम आहे फक्त बघण्याची नजर हवी ! कारण आपला साथीदार जाड झाला असो वा बारीक. त्याचे केस, राहणीमान, या वरून हे बघून कोणीही प्रेम करतं. पण आतील सुंदरता बघायला नजर आणि मोठ मन लागतं आणि तेच देवेंद्रकडे आहे. अशी कबुली खुद्द अमृताने एका मुलाखतीत दिली आहे .

Loading...

पुढे प्रेम अधिका-अधिक फुलत गेले . या प्रेमाचा पुरावा छोटीशी दिविजाचा निरागस चेहऱ्यात दिसतो. या दोघांचे प्रेम असेच दिवसेंदिवस द्विगुणीत होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

Loading...