लोटा पार्टी! हिंगोली जिल्ह्यात अनुदान लाटूनही ‘मुक्त’हागणदारी

हिंगोली: जिल्ह्यात शासनाने मोठ्या गाजावाजासह गाव हागणदारी मुक्त करू अशी घोषणा केली होती. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत पुसेगावातील गरिबातील गरीब नागरिकांनी शौचालयाचे बांधकाम केले व त्यांना निधी देण्यात आला. परंतु त्या शौचालयाचा उपयोग न करता लोटाबहाद्दर बाहेर उघड्यावर शौचालयास बसण्याची संख्या कमी झालेली नाही. तेव्हा गावात गुड मॉर्निंग पथक तैनात करून उघड्यावर शौचालयास बसणाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी जनतेतून केली जात आहे.

ज्या नागरिकांच्या घरी शौचालय नाही अशा नागरिकांचा शासनाने सन २०११-१२ मध्ये ऑनलाईन सर्वे केला. त्या सर्वेमध्ये गावात ५०७ नागरिकांच्या घरी शौचालय बांधकाम केले नाही. या ५०७ नागरिकांनी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत शौचालयाचे बांधकाम केल्यास प्रत्येकी १२ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येईल, या आशेवर शौचालय बांधकाम करणाऱ्यास सुरुवात केली. अनुदान देण्याअगोदर काही मातब्बरांनी शौचालय बांधून त्यांचा उपयोग करण्यास सुरुवात केली. मात्र गोरगरीब जनतेने शासनाचे अनुदान येणार या आशेवर शौचालयाचे बांधकाम केले.

शौचालय बांधकामानंतर स्वच्छ भारत मिशन अंतर्गतच्या ॲपवर सदरील शौचालयाचे फोटोही आपलोड केले. आणि अनुदानही लाटले; परंतु अनुदान लाटणाऱ्यांपैकी काही जणच शौचालयाचा पुरेपूर उपयोग घेताना दिसत आहेत. तर अनुदान लाटलेल्यांपैकी अजूनही सकाळी सकाळी खुल्या रिकाम्या जागेत उघड्यावर शौचालयास बसताना दिसून येतात. याकडे मात्र जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशनने लक्ष घालून गुड मॉर्निंग पथकाची नेमणूक केली तर याला आळा बसण्यास फारसा वेळ लागणार नाही.

महत्वाच्या बातम्या