भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनाने कृषी क्षेत्राची जाण असणारे नेतृत्व गमावले- महादेव जानकर

मुंबई : राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग उर्फ भाऊसाहेब फुंडकर यांच्या आकस्मिक निधनाने मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सहकारी आणि कृषी क्षेत्रातील जाणकार व्यक्तिमत्त्वाला महाराष्ट्र पारखा झाला आहे, या शब्दात पशुसंवर्धन,दुग्धविकास व मत्स्यविकासमंत्री महादेव जानकर यांनी शोक व्यक्त केला आहे.

भाऊसाहेब यांचे शेतीशी आणि मातीशी घट्ट नाते होते. शेतकऱ्यांच्या उन्नतीची तळमळ असल्याने त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. भाऊसाहेब यांच्या कुटुंबियांना या दु:खातून सावरण्यासाठी ईश्वर बळ देवो अशी प्रार्थना करतो, असेही श्री. जानकर म्हणाले.Loading…
Loading...