औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी नेहमीच या ना त्या कारणाने संकटात सापडत असतो. कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पाऊस यासारख्या अनेक कारणामुळे तो नेहमीच त्रासलेला असतो. यावेळी मात्र महावितरणने थकित वीजबिलाच्या कारणामुळे चित्तेपिंपळगाव येथील शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडीत केला. त्यामुळे रब्बी पीके सुकू लागल्याने शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शासनाच्या परिपत्रकानुसार कृषी ग्राहकांची सुधारित थकबाकीची रक्कम ही सप्टेंबर २०२० च्या बिलानुसार गोठवण्यात आली आहे. या रकमेचे कुठलेही व्याज किंवा विलंब आकार लागणार नाही आणि महत्वाचे म्हणजे ही थकित रक्कम भरण्यासाठी शेतकऱ्यांना ३१ मार्च २०१४ पर्यंत म्हणजे पुढील तीन वर्षे मुदत दिली आहे. पण महावितरण कंपनीने कोणतीही पुर्वकल्पना न देता व कोणत्याही प्रकारची नोटीस न देता चुकीच्या पद्धतीने वीज पुरवठा खंडीत केला आहे.
जर एखादा शेतकरी वीज बिल भरत नसेल तर थेट वीज पुरवठा खंडीत न करता पहिले त्याला कलम ५६ नुसार नोटीस द्यावी लागते. पण या सर्व बाबी बाजुला सारुन महावितरणने पाच दिवसांपासून रोहित्रावरून वीज कनेक्शन बंद केले आहे. त्यामुळे रब्बी पिके ऐन कणसात आली असताना धोक्यात आली आहेत. त्यामुळे नुकसान होण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत करु नये अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
- ‘डिसीसी’साठी धनंजय मुंडेंनी बीडमध्ये तळ ठोकले
- टप्प्यात येताच कार्यक्रम लावला, सांगली महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा; चंद्रकांतदादांना मोठा धक्का
- आरबीआयकडून हटके अंदाजात बनावट फोन आणि मेसेज संदर्भात अलर्ट जारी
- अहो दानवेजी, मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले ऐकायचं नाही असं ठरवलं काय?
- इंधन दरवाढी वरून आरबीआय गव्हर्नर यांच सरकारला अप्रत्यक्ष आवाहन