वजन कमी तर पैसे जास्त; नव्या चित्रपटासाठी बेबोने मागितली इतकी रक्कम

kareena

मुंबई: अभिनेत्री करीना कपूर खान तिच्या फिटनेसची नेहमीच काळजी घेत असते. नुकतेच तिने दुसऱ्या बाळाला जन्म दिल्यानंतर तिचे वजन अधिक वाढले होते. त्यानंतर आता तिने स्वतःला फिट ठेवण्यासाठी प्रयत्न केल्यांचं दिसत आहे. करिनाने अनेक सुपर हिट चित्रपटामध्ये काम केले आहे. आता पुन्हा एकदा ती चित्रपटांमध्ये काम करण्यास सज्ज झाली आहे. मात्र यावेळी ती तिच्या चित्रपटातील मानधनामुळे चर्चेत आली आहे.

‘रामायण’ या चित्रपटातील सीतामातेच्या भूमिकेसाठी निर्मात्यांनी करीनाला निवडायचं ठरवलं पण करीनाची फी ऐकून निर्मातेही मोठ्या गोंधळात पडले. या रोल साठी करीनाने तब्बल १२ कोटी रुपायांची मागणी केली. तसे तर करीना एका चित्रपटासाठी ६ ते ८ कोटी रुपये मानधन घेते. याबाबत आता करीनासोबत निर्माते चर्चा करणार आहेत. अजून चित्रपटाविषयी निर्मात्यांनी कोणतही अधिकृत विधान केले नसून लवकरच याविषयी घोषणा केली जाणार असण्याची शक्यता आहे.

करीना ‘वीरे दी वेडींग’ आणि हंसल मेहतांच्या आणखी एका चित्रपटासाठी ती काम करत आहे.  याशिवाय करीना करण जोहरच्या ‘तख्त’  चित्रपटातही दिसणार आहे. आमिर खान सोबत लवकरच ती ‘लालसिंग चड्डा’ या चित्रपटातही झळकणार आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP