Share

Weight Loss Tips | झोपण्यापूर्वी ‘ या ‘ गोष्टी करून वजन कमी करा

टीम महाराष्ट्र देशा: वाढते वजन ही आजकाल खूप सामान्य गोष्ट आहे. त्यामुळेच वजन कमी करण्यासाठीचा ट्रेंड सर्वत्र सुरू झालेला आहे. प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या प्रकारे वजन कमी करण्याचे प्रयत्न करत असतो. कारण वजन कमी असल्याने शरीर सुदृढ राहून आजारांपासून दूर राहते. वजन कमी करायचे असेल तर आपल्याला दररोजच्या जीवनात आणि खाण्याच्या सवयी मधील काही विशिष्ट बदल करावे लागतात. त्याचबरोबर रात्री झोपण्याआधी काही विशिष्ट गोष्टी केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. आणि शरीरही निरोगी राहते.

रात्री झोपण्यापूर्वी वजन कमी करण्यासाठी या गोष्टी करा

लवकर जेवण करा

जर तुम्हाला तुमचे वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर रात्री सात वाजेपर्यंत तुम्ही जेवण केले पाहिजे. तुमचे जेवण आणि झोप यामध्ये कमीत कमी तीन तासाचे अंतर पाहिजे. त्यामुळे अन्नपचन व्यवस्थित होते. रात्री उशिरा जेवल्याने अन्नपचना समस्या निर्माण होतात आणि त्यामुळे लठ्ठपणा ही लवकर वाढतो.

रात्रीच्या जेवणात या गोष्टींचा समावेश करा

रात्रीच्या जेवणामध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन आणि फायबर उपलब्ध असलेल्या पदार्थांचे सेवन करा. शक्य असल्यास रात्रीचे जेवण थोडे हलके करावे. विशेषतः रात्रीच्या जेवणात हिरव्या भाज्या, सूप, डाळ चापतीचा समावेश करावा. या गोष्टीमुळे कॅलरीज ही कमी होतील आणि पोटही सहज भरेल.

झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्या

रात्री झोपण्यापूर्वी गरम पाणी पिल्यामुळे अन्नपचन होण्यास मदत होते. त्याचबरोबर गरम पाणी पिल्याने वजन देखील कमी होऊ लागते. त्यामुळे एक ग्लास कोमट पाणी हे शरीरासाठी नेहमी फायदेशीर ठरते.

झोपण्यापूर्वी हळद घालून दूध प्या

रात्री झोपताना तुम्ही एक ग्लास दूध पिऊ शकतात. पण त्या दुधात जर एक चमचा हळद मिसळली तर तुम्हाला त्याचे अनेक फायदे मिळू शकतात. रात्री झोपताना दुधात हळद टाकून पिल्याने वजन कमी होण्यास मदत होते आणि चांगली झोपे लागते.

आवश्यक तितकी झोप घ्या

रात्री झोपण्यापासून इलेक्ट्रॉनिक गॅजेट (मोबाईल) पासून दूर राहा. किंवा झोपण्यापूर्वी वाचनाची सवय लावा. त्यामुळे तुम्हाला चांगली झोप मिळेल. शरीराला पोषक आहार आणि व्यवस्थित झोप मिळाले की लठ्ठपणा कमी होऊन शरीर निरोगी होऊ लागते.

टीप : वरील गोष्टींसाठी डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला घ्या.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: वाढते वजन ही आजकाल खूप सामान्य गोष्ट आहे. त्यामुळेच वजन कमी करण्यासाठीचा ट्रेंड सर्वत्र सुरू झालेला आहे. …

पुढे वाचा

Health

Join WhatsApp

Join Now