‘चुना लावलाय वाटतं’; हटके फोटोशूटमुळे श्रुती मराठे ट्रोल

श्रुती मराठे

मुंबई : मराठी अभिनेत्री श्रुती मराठे सोशल मीडियावर चर्चेत असते. जेवढी श्रुतीच्या अभिनयाची चर्चा होते इतकीच तिच्या सौंंदर्याची चर्चा असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना अधिक पसंत  पडल्या आहेत. नुकताच श्रुतीने तिचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. मात्र या फोटोवरुन तिला ट्रोल करण्यात आले आहे.

श्रुतीने  शेअर केलेल्या या फोटोत तिने गोल्डन रंगाची पॅन्ट त्यावर पांढऱ्या रंगाचं शर्ट आणि पॅन्टला मॅचिंग गोल्डन रंगाचं ब्लेझर परिधान केलंय. मात्र श्रुतीने केलेल्या हटके मेकअप केला असल्याचे दिसत आहे. यात तिने पांढऱ्या रंगाचं आय लायनर लावल्याचं दिसतं आहे. यावरुन नेटकऱ्यानी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘चुना लावलाय वाटतं’,  ‘घाबरतील लहान पोरं’, ‘बकवास मेकअप लूक आहे.’असे  एक अनेक मजेशीर कमेन्ट करत तीला ट्रोल केले आहे.

श्रुतीने मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही चाहत्यांची मनं जिंकली आहेत. तमिळ सिनेमा ‘इंदिरा विजहा’ने मधून तिने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. श्रुतीने विविध मराठी, तमिळ चित्रपटात काम केले आहे. साउथमध्ये ती ‘श्रुती प्रकाश’ या नावाने प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या अंदाजातील श्रुतीच्या फोटोंना रसिकांनी कायमच पसंती दिली आहे. मात्र यावेळी तिला चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP