औरंगाबाद : राज्यात असलेल्या परिस्थितीवरुन मनात काहुर माजले आहे. उद्या लक्ष्मीचे आगमन होणार आहे आणि अशा काळात राज्यातील महिला सुरक्षित नाही. हे सरकार देखील झोपेतच असल्याने त्यांना महिलांवरील अत्याचार दिसत नसल्याची टीका भाजप महिला मोर्चाच्या राज्य उपाध्यक्ष अॅड. माधुरी अदवंत यांनी केली आहे. ‘महाराष्ट्र देशा’च्या औरंगाबाद कार्यालयात अॅड. अदवंत यांच्या हस्ते श्रीगणेशाची आरती करण्यात आली. त्या वेळी त्या बोलत होत्या.
राज्यातील सर्वांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या. मुंबईतील साकीनाका भागात झालेल्या अत्याचारावरुन त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. राज्यात शक्ती कायदा नाही, महिला आयोगाला अध्यक्ष नाही, राज्यातील फास्ट कोर्ट देखील नावालाच असल्याचेही त्या म्हणाल्या.
या सर्वात महाराष्ट्रावरील कोरोनाचे संकट टळू दे, महिलांवर होणारे अत्याचार थांबू दे आणि राज्यातील अशा विक्रृत मनोवृत्तीच्या लोकांना कडक शासन करण्याची सुबुध्दी राज्य सरकारला देण्याचे साकडे त्यांनी गणराया चरणी घातले. इतकेच नाही, राज्यातील कायदा महिलांच्या हाती दिल्यास अशा मनोवृत्तीला ठेचून काढू, अशा इशाराही त्यांनी दिला. राज्य सरकारला सुबुद्धी देण्याची मागणी त्यांनी गणेशाच्या चरणी केली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘धनुभाऊ, माध्यमांना ब्लॉक करून काय होणार? परिस्थितीला सामोरे तर जावेच लागेल ना!’
- आता कुठल्याही परिस्थितीत निवडणुका घ्याव्याच लागतील; सदावर्ते यांचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल
- ‘शिवसेनेतील नेत्यांकडूनच मुख्यमंत्री ठाकरेंची दिशाभूल’, मुनगंटीवार यांची टीका
- खाद्यतेलावरील आयात शुल्कात कपात, हा शेतकऱ्यांना आणखी एक धक्का – तुपकर
- ओबीसी समाजाला धक्का : राज्य सरकारला निवडणुका पुढे ढकलता येणार नाही – सर्वोच्च न्यायालय