हनीप्रीत इंसा विरुद्ध लुकआऊट नोटीस जारी

Gurmeet-Ram-Rahim-Singh-Honeypreet

चंदीगड : डेरा प्रमुख राम रहीम यांच्या पलायनाचा कट रचल्याप्रकरणी  राम रहीम यांची मानसकन्या हनीप्रीत इंसा हिच्याविरुद्ध हरियाणा पोलिसांनी लुकआऊट नोटीस जारी केली आहे.

लूकआऊट नोटीस जारी झाल्यामुळे हनीप्रीत देश सोडून जाऊ शकत नाही.  साध्वींचे लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 25 ऑगस्ट रोजी राम रहीम यांना केंद्रीय अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरविले होते.

त्यानंतर राम रहीम यांची पळून जाण्याची योजना होती. मात्र, हरियाणा पोलीस आणि लष्कराने  त्यांची योजना उधळून लावली . या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाचे न्यायमुर्ती जगदीप सिंह यांनी राम रिहम  यांना 20 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. राम रहीम यांना शिक्षा सुनावल्यानंतर हनीप्रीत फरार झाली आहे.