पहा या कॉंग्रेस नेत्याचा अफलातून नागीण डान्स

टीम महाराष्ट्र देशा : कर्नाटकमध्ये प्रचारावेळी आलेल्या एका कॉंग्रेस नेत्याने ‘नागीण डान्स’ केला आहे. त्यामुळे आता या नागीण डान्सर कॉंग्रेस नेत्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. होसकोट मतदारसंघात प्रचारासाठी आलेले कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एमटीबी नागराज यांनी हा नागीण डान्स करून समर्थकांना खुश केले आहे.

नागराज हे आपल्या समर्थकांबरोबर कटीगन्नाली गावामध्ये प्रचारासाठी गेले होते. काँग्रेसचे उमेदवार विरप्पा मोहली यांना मतदान करा, असे गावकाऱ्यांना सांगण्यासाठी नागराज चिक्काबल्लापूरा मतदारसंघातील या गावात आले होते. त्यावेळी मतदारांना आकर्षित करण्यासाठी नागराज यांनी अचानक नागीण गाण्यावर नृत्य करण्यास सुरुवात केली. हे नृत्य समर्थकांनी शूट केले असून ते आता सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.