पहा, वनप्लसच्या सर्वात स्वस्त फोनचा लूक

one plus nord

मुंबई : ज्या फोनची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होती. तो OnePlus ने आपला बहुचर्चित व स्वस्त किंमतीचा स्मार्टफोन OnePlus Nord काल रात्री लाँच केला आहे. वनप्लस कंपनीचा आता पर्यंतचा हा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. काल रात्री साडे सातच्या सुमारास एका ऑनलाइन कार्यक्रमात हा फोन लाँच केला आहे. भारतात या फोनची किंमत २४ हजार ९९९ रुपये आहे.

या फोनची काही वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे :
वनप्लसचा हा स्वस्तातील स्मार्टफोन OxygenOS 10.5 वर बेस्ड अँड्रॉयड १० वर काम करतो. या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 765G प्रोसेसर दिला आहे. वनप्लस नॉर्ड ऑफिशल IP रेटिंग सोबत येतो. त्यामुळे या फोनची किंमत कमी करण्यात आली आहे. नॉर्ड सीरीजला लाँच करण्यामागे कंपनीचा उद्देश सुद्धा कमी किंमत करणे हाच दिसून येतो आहे. तसेच वनप्लसने या फोनसोबत इयरबड्स सुद्धा लाँच केले आहेत.
१) भारतात ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजमध्ये स्मार्टफोनची किंमत २४ हजार ९९९ रुपये आहे. हा फोन सप्टेंबर मध्ये भारतात उपलब्ध होणार आहे.
२) ८ जीबी रॅम प्लस आणि १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत २७ हजार ९९९ रुपये आहे.
३) १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत २९ हजार ९९९ रुपये आहे.

वनप्लस नॉर्डमध्ये कंपनीने ६.४४ इंचाचा अमोलेड डिस्प्ले दिला आहे. जो 90Hz रिफ्रेश रेट ऑफर करीत आहे. स्क्रॅच आणि क्रॅक पासून वाचण्यासाठी फोनच्या बॅक आणि फ्रंटला गोरीला ग्लास ५ चे प्रोटेक्शन दिले आहे. वनप्लसच्या फ्लॅगशीप फोन्स प्रमाणे या फोनमध्येही दोन वर्षा पर्यंत सॉफ्टवेयर अपडेट आणि ३ वर्षापर्यंत सिक्योरिटी अपडेट्स मिळतील. फ्लॅगशीप वनप्लस ८ सीरीज प्रमाणे ५ जी सपोर्ट करतो. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 765G प्रोसेसर देण्यात आला आहे. आधीच्या स्नॅपड्रॅगन 730G च्या तुलनेत जवळपास ३० टक्के अधिक वेगाने ग्राफिक्स रेंडर करतो.

कॅमेरा : वनप्लस नॉर्डला ४ रियर कॅमेरा आहेत. म्हणजेच फोनच्या मागे ४ कॅमेरे दिले आहेत. फोनच्या मागे मेन कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा Sony IMX586 सेंसर दिला आहे. तसेच फोनच्या मागे ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा, ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स दिला आहे. कंपनीने यात समोरच्या भागात ड्यूल पंच होल कॅमेरा सेटअप दिला आहे. सेल्फीसाठी फोनच्या समोर ३२ मेगापिक्सलचा प्रायमरी आणि ८ मेगापिक्सलचा वाइड अँगल सेकंडरी लेन्स दिला आहे.

29,999 रुपयात सॅमसंग गॅलेक्सी एस 9 खरेदी करण्याची संधी

शाळांना राजकीय फूटबॉल बनवू नका; WHO चा इशारा

‘कोरोनापासून बचावासाठी गोमूत्र प्या’, भाजपा नेत्याचा अजब सल्ला