‘भाजपचा विकास पाहा, बेरोजगारीमुळे रविवार-सोमवार सारखाच’, राहुल गांधींचा टोला

RAHUL GANDHI

मुंबई: मागील वर्षापासून असलेल्या कोरोना महामारीच्या संकटामुळे अनेक कंपन्यांना आर्थिक फटका बसला. यातच जगातील सुप्रसिद्ध फोर्ड ही वाहन उत्पादक कंपनी भारतामधील आपला व्यवसाय बंद करणार आहे. त्यामुळे ४००० नोकरदारांवर आर्थिक संकट कोसळणार आहे. यावरूनच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाना साधला आहे.

‘भाजपचा विकास पाहा, बेरोजगारीमुळे रविवार-सोमवार सारखाच’, असे म्हणत राहुल गांधींनी यांनी मोदींना टोला लगावला आहे.
मागील काही काळापासून हि कंपनी तोट्यात असल्याने FORD कंपनीच्या वाहनांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे देखील दिसत आहे.

फोर्ड कंपनीची वाहने असलेल्या ग्राहकांची गैरसोय होणार नाही यासाठी फोर्ड कंपनी आपल्या डिलर्सच्या माध्यमातून ग्राहकांना सेवा पुरवत राहील. फोर्ड कंपनीकडून गाड्यांच्या इंजिन निर्यातीसाठीचे युनिट सुरु ठेवले जाऊ शकते. तसेच कंपनीची सप्लाय चेन सुरळीत राहावी, यासाठी फोर्ड कंपनीचे लहानसे नेटवर्क कार्यरत राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र एकदमच ४००० कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट कोसळणार आहे.

महत्वाच्या बातम्या :