‘लांब फेकणारा खेळाडू टोकियोला गेला नाही, त्यामुळे भारताने गोल्डन संधी गमावली’, काँग्रेसचा टोला

‘लांब फेकणारा खेळाडू टोकियोला गेला नाही, त्यामुळे भारताने गोल्डन संधी गमावली’, काँग्रेसचा टोला

मुंबई : भारत अनेक क्रीडा प्रकारात जगात नंबर एक, नंबर दोन क्रमांकावर आहेत. पण हेच खेळाडू टोकियो ऑलिम्पिकमध्ये अपयशी ठरलेत. नेमबाजी व तिरंदाजीत भारतीय खेळाडू नंबर वन असूनही पदकांच्या बाबतीत सपशेल अपयशी ठरलेय.

ऑलिम्पिक २०२० मध्ये भारतीय नेमबाजांनी निराशजनक कामगिरी केली. पुरुष आणि महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल वैयक्तीक आणि सांघिक प्रकारात पदकांची १०० टक्के हमी असताना भारतीय नेमबाज अपयशी ठरले. त्यानंतर २५ मीटर पिस्तूल प्रकारात देखील अपयश आले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सर्वात शेवटीच अपेक्षा होती ती ५० मीटर रायफल थ्री पोजिशन या प्रकारात. पण तेथेही निराशा पदरात पडली.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळाची रणधुमाळी सुरू असताना देशात मात्र राजकीय धुळवड सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर विरोधक टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. कोरोना, लसीकरण, ढासळलेली अर्थव्यवस्था, इंधन दरवाढ, महागाई इत्यादी मुद्द्यांवरून काँग्रेस नेते मोदी सरकारला टार्गेट करत आहेत. पण आता ऑलिम्पिकमध्ये नेमबाजांच्या कामगिरीवरून काँग्रेसने मोदींवर निशाणा साधला आहे.

काँग्रेस नेते भाई जगताप यांनी ट्विटरवर एक विनोद पोस्ट करून मोदींना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. ‘लांब फेकण्याचा सर्वोत्तम अनुभव असलेला देशाचा खेळाडू, टोकियोला पाठवला गेला नाही. भारताने सुवर्णपदकाची संधी गमावली’ असे म्हणत एक स्माईल पोस्ट केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ ला सत्तेत येण्यापूर्वी अनेक आश्वासने दिली होती. परंतू आजघडीला त्याच्या विरोधात चित्र असल्याचा आरोप विरोधकांकडून होतोय. मोदी खोटे बोलून, लोकांना भूलवून सत्तेत आल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. त्यामुळे मोदींवर वारंवार उपहासात्मक टीका केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या