Video- देसाई,एकबोटे,भिडेंवरील खोटे गुन्हे मागे घ्या; राज्यभर संभाजी भिडेंंचे समर्थक रस्त्यावर

टीम महाराष्ट्र देशा- कोरेगाव भीमा हिंसाचारात विनाकारण संभाजी भिडे गुरुजींना गोवण्यात आला असून त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी करत आज राज्यभर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून मोर्चा तसेच आंदोलने करण्यात आली. १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भिमा हिंसाचार प्रकरणी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. एकबोटे यांना अटक करण्यात आली. मात्र संभाजी भिडे यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. दरम्यान. संभाजी भिडेंना देखील अटक करण्याची मागणी करत प्रकाश आबेंडकर यांनी मुंबईमध्ये एल्गार परिषद घेतली होती. आज संभाजी भिडे गुरुजी यांच्या सन्मानार्थ राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

भिडे गुरुजींना ‘क्लीन चिट’
कोरेगाव भीमा प्रकरणात संभाजी भिडे गुरुजींचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचा कुठलाही पुरावा हाती लागलेला नाही. शिवाय, ज्या महिलेने त्यांच्याविरोधात तक्रार केली होती तिनेच आपण भिडे गुरुजींना ओळखत नसल्याची साक्ष दिली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. तथापि, गुरुजींविरोधात काही नवे पुरावे आले असून त्याचा तपास करून आठ दिवसांत पुढील कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

या आहेत श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या मागण्या……
1. संभाजी भिडेंवरील तथाकथित खोटे गुन्हे सरकारने तत्काळ मागे घ्यावेत
2. मिलिंद एकबोटे, धनंजय देसाई यांची खोट्या आरोपातून मुक्तता करावी.
3. पुण्यातील यल्गार परिषदेतील सर्व जातीयवादी वक्त्यांवर कारवाई करावी
4. कोरेगाव-भीमा हिंसाचारात मृत्यूमुखी पडलेल्या राहुल फटांगळेला न्याय मिळावा
5. 3 जानेवारी 2018 ला करण्यात आलेल्या महाराष्ट्र बंददरम्यान झालेल्या नुकसानीची भरपाई बंद पुकारणाऱ्यांंकडूनच करावी
6. हिंसाचारामागे नक्षली हात आहे का?, यावर चौकशी समिती नेमावी

मुंबई, पुण्यात परवानगी नाकारली…
मुंबई आणि पुण्यात मात्र भिडे गुरुंच्या समर्थनार्थ काढण्यात येणाऱ्या सन्मान मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली . मुंबईत भायखळा ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात येणार होता, मात्र या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. दुसरीकडे, आझाद मैदानात सभेची परवानगी देण्यात आल्याची माहिती मिळाली .

सांगली – शहरात या मोर्चा काढण्यात आला. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सांगली शहरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रावसाहेब देसाई, शशिकांत नागे, शशिकांत हजारे, धनंजय मद्वाण्णा, बाळासो बेडगे, राजु बावडेकर, प्रदीप बाफना यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन दिले.

पुणे- शिवप्रतिष्ठानतर्फे शनिवार वाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र सुरक्षिततेच्या कारणावरून पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली. संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ राज्यात ठिकठिकाणी आज ‘गुरुवर्य सन्मान महामोर्चा’ काढण्यात आला. पुण्यातही भिडे गुरुजी समर्थकांनी नदीपात्रात ठिय्या आंदोलन केले. संभाजी भिडेंवरील खोटे गुन्हे मागे घ्यावे, मिलिंद एकबोटे यांची सुटका करावी, तसेच संभाजी भिडे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात येत आहे, अशा घोषणा देऊन भिडे गुरुजी समर्थकांनी विरोध दर्शवला.

सोलापूर : श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या सन्मानार्थ आज सोलापूर शहरातील पार्क चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ या मोर्चात पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट आदी तालुक्यातून शेकडो कार्यकर्ते उपस्थित झाले आहेत़.Loading…
Loading...