फक्त मनोरंजनसाठी खोटा इतिहास दाखवला जात असल्याचा राजस्थानी समाज संघाचा आरोप

पुण्यात पद्मावती सिनेमाविरोधात महामोर्चा

पुणे – अखिल राजस्थानी समाज संघाच्या वतीने पद्मावती चित्रपटाला विरोध दर्शविण्यासाठी  आज पुण्यात महामोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्च्या काढण्यात आला होता.पद्मवतील चित्रपटातील इतिहास हा पूर्ण खोटा व चुकीचा दखवलेला आहे. त्याचबरोबर यामध्ये  दाखवलेला राणी पद्मवतीचे प्रेम प्रकरण पूर्ण खोट आहे. फक्त मनोरंजनसाठी असा खोटा इतिहास दाखवत आहेत. चित्रपटावर पूर्णपणे भारतात बंदी घालावी राज्यस्थानी समाज संघाच्या वतीने करण्यात आली आहे.