पैठणच्या खुल्या कारागृहातील कैद्यांची व्यथा

Harshal-Rawte

अभय निकाळजे /औरंगाबाद : पैठणच्याच नाही तर महाराष्ट्रातील अनेक कारागृहात ‘हर्षल रावते’ आहेत. संजय दत्त हा अभिनेता आहे, म्हणुन त्याची शिक्षा कमी होते. पण ज्यांची शिक्षा संपल्यावरही कारागृहात सडत पडावे लागले तर हाच हर्षलने जो मार्ग स्विकारला, तो स्विकारण्याशिवाय पर्याय राहात नाही.

पैठणच्या खुल्या कारागृहातील काही जणांचा विद्यापीठात संपर्क आला. त्यावेळी त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या ‘हर्षल’ ने शुक्रवारी मंत्रालयातील पाचव्या मजल्यावरून उडी मारल्यावर पुन्हा ताज्या झाल्या. या कैद्यांना खुल्या कारागृहात ठेवले जाते, कारण त्यांची नियमीत कारागृहातील वर्तन चांगले ठेवल्यानेच. त्या कैद्यांचे तिथले वर्तन (म्हणजे खुल्या कारागृहातील) चांगले असेल, तर शिक्षेत त्यांना सवलत मिळू शकते. पण त्यासाठी महसुल, कारागृह प्रशासन आणि पोलिस अशा तिन्ही खात्यांची एकत्रित बैठक व्हावी लागते. हीच पद्धत पॅरोलसाठीही वापरतात.

हर्सुल कारागृहातील पॅरोलवर सुटलेले, पण पुन्हा हजर न झालेल्या कैद्यांची गृहमंत्रालयाने जाहीरात दिली होती. त्यानंतर त्या जाहीरातीचा बातमीदार म्हणून पाठपुरावा केला, पण फारसा उपयोग झाला नाही. कारण पॅरोलवर सोडतांना ‘जामीनदार’ घेतला जातो. पण त्या जामीनदारांवरही काही कारवाई केल्याचे ऐकिवात नाही. म्हणुन हर्षलने जे पाऊल उचलले, ते सगळ्यांना शक्य नाही. पण ज्या कैद्यांच्या शिक्षा संपल्या आहेत. त्यांच्या सुटकेचे काही धोरण शासनाने निश्चित केले पाहीजे. या कैद्यांना सोडले तर कारागृहातील जागाही रिकाम्या होतील आणि कारागृहातील बऱ्यकमध्ये कैद्यांची जी कोंबाकोबी केली जाते, ती थांबेल.हा प्रश्न कैद्यांचा असल्याने त्यावर राजकीय लोक भाष्य करणार नाहीत. पण आयुष्यात केलेल्या एका चुकीची शिक्षा भोगत असेल तरी ती माणसेच आहेत ना, मग त्यांनाही न्याय मिळालाच पाहीजे.Loading…
Loading...