एकविरा देवीचा सोन्याचा मुलामा असलेला कळस चोरीला

लोणावळा : महाराष्ट्रातील जागृत देवस्थान असलेल्या लोणावळ्याजवळील कार्ला गडावरील एकविरा देवी मंदिराचा कळस चोरीला गेला आहे. वेहेरगाव येथील कार्ला एकविरा देवीच्या मंदिरावर असलेला कळस काल मध्यरात्री चोरीला गेला आहे. सदर कळस हा तांब, चांदी आणि पंचधातु पासून बनविलेला असून या कळसाला सोन्याचा मुलामा देण्यात आला असल्याचं विश्वस्त सांगत आहेत.

तसेच या कळसाची किंमत साधारण सव्वा लाख रुपये असल्याचे विश्वस्तांकडून सांगण्यात आलाय. पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर चोरट्यांचा शोध घेत आहेत.Loading…
Loading...