रविवारी पुणे लोणावळा लोकलच्या दोन फे-या रद्द

पुणे-  पुणे ते लोणावळा दरम्यान रविवार (दि. 3 डिसेंबर) रोजी तांत्रिक कामे करण्यात येणार आहेत. या कामांसाठी तीन तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेतील पुणे ते लोणावळा आणि लोणावळा ते पुणे अशा एकूण दोन फे-या रद्द करण्यात आल्या आहेत.

गाडी क्रमांक 99816 पुणे स्थानकावरून दुपारी 12.15 वाजता सुटणारी गाडी रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक 99820 पुणे स्थानकावरून दुपारी 03.00 वाजता सुटणारी गाडी रद्द करण्यात आली आहे.

गाडी क्रमांक 99907 ही गाडी तळेगाव स्थानकावरून दुपारी 04.38 वाजता सुटेल तसेच गाडी क्रमांक 99906 पुणे स्थानकावरून दुपारी 03.40 वाजता सुटणारी पुणे-तळेगाव ही लोकल गाडी लोणावळापर्यंत धावणार आहे