राज्यातील प्लास्टिक बंदीचा पहिला दणका वाईन शॉपला

blank

टीम महाराष्ट्र देशा : पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी राज्यात प्लास्टिक बंदीचा कठोर निर्णय घेतल्यानंतर राज्यातील पहिली कारवाई लोणावळा नगरपरिषदेअंतर्गत करण्यात आलीय. या कारवाईत लोणावळा येथील व्ही.के.वाईन शॉपमध्ये प्लास्टिक कॅरिबॅग वापरल्या प्रकरणी या वाईन शॉपला १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय.

या कारवाईमुळे लोणावळा परिसरातील व्यापारी मात्र खडबडून जागे झाले आहेत. राज्यात १८ मार्चपासून प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली. त्यानंतर प्लास्टिक बंदीच्या कारवाईची ही पहिलीच घटना आहे.

पूर्ण प्लास्टिक बंदी असली तरी अजूनही अनेक दुकानांमध्या सर्रास प्लास्टिक बॅगा दिल्या जातायत.

blank